महाराष्ट्र

विधवा पुनर्विवाह जकातवाडी पॅटर्न राज्य शासनाने महाराष्ट्रात राबवावा व पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला अनुदान द्यावे जकातवाडी ग्रामपंचायतीची मागणी

टीम लय भारी

सातारा : राज्यातील जकातवाडी (ता. सातारा) ग्रामपंचायतीने गावातील विधवा पुनर्विवाह करतील, त्यांना २० हजारांची आर्थिक मदत करण्याचा पुरोगामी निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतीने असा आदर्श घ्यावा. विधवा पुनर्विवाहाचे क्रांतिकारी पाऊल उचलणारी जकालवाडी ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत आहे. जकातवाडी येथील ग्रामस्थांनी खासदार सुप्रियाताईं सुळे (Supriya Sule) यांना निवेदन दिले आहे. Jakatwadi grampanchyat appeal to Supriya Sule

कोरोना काळात अनेक महिला विधवा झाल्या आहेत. अपघात, हार्ट अटॅक कॅन्सरसारखे आजार, व्यसनाधीनता याकारणांमुळे युवकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ऐन तारुण्यात मुली विधवा होतं आहेत. समाजात मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुलांच्या लग्नाचा सामाजिक प्रश्न गावागावात नव्याने उभा राहत आहे.

आंतरजातीय लग्न करण्यासाठी शासन अनुदान देतात त्याच धर्तीवर विधवा पुनर्विवाहास सरकारने अनुदान उपलब्ध करून दिले तर विधवांच्या विवाहाला चालना मिळेल. महात्मा फुले, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांची विधवा पुनर्विवाह ही चळवळ महाराष्ट्रभर सुरू केली होती. आता महाराष्ट्र शासनाने राज्यात जकातवाडी पॅटर्न राबवावा. यासाठी सुप्रियाताईं, आपण पुढाकार घेऊन विधवांच्या पुनर्विवाहाच्या चळवळीला राज्य सरकारच्या माध्यमातून बळ असे निवेदन देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा: 

दिवंगत विलासराव देशमुख यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात

BREAKING | Samajwadi Party To Nominate Ally Jayant Chaudhary Instead Of Dimple Yadav For Rajya Sabha Polls 2022

Shweta Chande

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

4 hours ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

5 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

5 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

6 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

15 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

15 hours ago