महाराष्ट्र

महाराष्ट्र चेंबरतर्फे २० एप्रिलला कृषी निर्यात संधींवर चर्चासत्र

भारत देश हा आजही कृषीप्रधान देश गणला जातो. पुर्वापार चहा, कॉफी, तांदुळ असे कृषी पदार्थ निर्यात होतात. याखेरीज साखर, द्राक्षे, काजू, स्ट्रॉबेरी, कांदे, केळी, संत्री असे कृषी (Agriculture) पदार्थही विविध देशांना निर्यात केले जातात. याखेरीज कापूस, वनस्पती तूप याचीही निर्यात होत असते. परंतु याखेरीज देखील विविध प्रकारची धान्य, फळभाज्या, भाजीपाला, मासे व त्याचे पदार्थ अशा अनेक कृषी वस्तूंना मोठी मागणी आशियायी तसेच युरोपियन देशातून आहे. भारत सरकारने एकूणच निर्यातीवर मोठा भर दिला असून त्यामध्ये कृषी विषयक अनेक पदार्थांना मोठी संधी आहे. (Maharashtra Chamber to hold seminar on agriculture export opportunities on April 20 )

यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने शनिवार दिनांक २० एप्रिल 2024 रोजी सकाळी ११.३० वाजता चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यावेळी या विषयातील तज्ञ श्री. शरद नानापुरे (पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत. श्री. नानापुरे हे फोरम फॉर इंटिग्रेटेड अग्रीकल्चर डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष असून त्यांना कृषी निर्यात संदर्भातील ४ दशकांचा गाढा अनुभव आहे. अनेक देशांमध्ये त्यांनी विविध कृषी उत्पादनांची निर्यात शक्य करून दाखविली आहे. कृषी विषयक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. देशाच्या कृषी क्षेत्राशी आर्थिक विकास जोडलेला आहे तेव्हा व्यापार राष्ट्रीय महसूल आणि रोजगार सकारात्मक मार्गाने एकत्र केले जातात तेव्हा देशाची गरीबी कमी होते आणि आर्थिक वाढीला चालना मिळते कारण मजबूत शेतीमुळे बऱ्याच प्रकारे देशाला फायदा होतो म्हणून शेतीवर लक्ष केंद्रित करणे हा विकासाला गती देण्याचा आणि जगात देशाची स्थिती सुधारण्याचा एक उत्तम मार्ग आहे

केवळ शेतकरीच नव्हे तर कृषी संबंधित व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना उपयुक्त असे मार्गदर्शन या चर्चासत्रातून मिळणार आहे. स्थळ – महाराष्ट्र चेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चर, उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय, ४९, ५ मजला, बिझनेस बे, श्रीहरी कुटे मार्ग, संदीप हॉटेल जवळ, मुंबईनाका, नाशिक येथे होणार आहे. चर्चासत्र विनामूल्य असून कृषी उत्पादने निर्यात करण्याची इच्छा असणाऱ्यांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे. चर्चासत्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणीसाठी (nsk@maccia.org.in) ०२५३-२५७७७०४, २५७५०५३ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन असे आवाहन अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, शाखा चेअरमन संजय सोनवणे, अग्रिकल्चर समितीचे को-चेअरमन राजाराम सांगळे व कार्यकारी सदस्यांनी केले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

1 hour ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

2 hours ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

2 hours ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

2 hours ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

3 hours ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

3 hours ago