महाराष्ट्र

कुपोषणाचा राक्षस पुन्हा जागा झाला; चार वर्षात राज्यात ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू

महाराष्ट्र हे पुरोगामी आणि विकसित राज्य असल्याचा डंका वाजवला जात असताना, राज्यात कुपोषणाचा राक्षस अक्राळविक्राळ रूप घेत चालला आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील १६ जिल्ह्यात ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती दस्तुरखुद्द महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी तारांकित प्रश्नोत्तरे दरम्यान दिली. याबाबतचा प्रश्न आमदार विलास पोतनीस, मनीषा कायंदे आदींनी उपस्थित केला होता.

राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात २०१९ ते २०२२ या काळात कुपोषणाने ६ हजार ५८२ बालकांचा मृत्यू झाला असून, १ लाख ३६ हजार ७३३ मुलांमध्ये तीव्र आणि अतितीव्र कुपोषा अधलून आले असून त्यापैकी १५ हजार २५३ मातांचे बालविवाह झाले असल्याची व २०२२ – २३ च्या अहवालानुसार केवळ नंदुरबार जिल्ह्यात सुमारे २४००० बालके कुपोषित असल्याची बाब निदर्शनास आली हे खरे आहे का, असा सवाल पोतनीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना तटकरे यांनी ही माहिती दिली.

आरोग्य विभागाकडून ६ जुलै २०२३ रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील आदिवासी बहुल १६ जिल्ह्यांची २०१९ ते २०२३ या चार वर्षाची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे. त्यानुसार २०१९ – २० मध्ये ९८१९, २०२०- २१ मध्ये ८९९०, २०२१ – २२ मध्ये ९०२४ तर २०२२ – २३ मध्ये ९४५९ अशा एकूण ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.

हे सुद्धा वाचा
ढगाळ वातावरणाने इर्शाळवाडीमध्ये मदतकार्यास अडथळे, सिडकोचे १ हजार कर्मचारी एनडीआरएफच्या मदतीला

शरद पवारांना मोठा धक्का; नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदार, प्रदेश कार्यकारिणी अजित पवारांच्या गळाला

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजन करणारा शहाणा कोण ? जंयत पाटलांचा खडा सवाल

आदिवासी जिल्ह्यातील जी बालके Sam आढळून आली आहेत, त्यांच्या मातांच्या विवाहा संबंधी त्या त्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांमार्फत एप्रिल २०२२ मध्ये सर्वेक्षण करून घेण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणात १५ हजार २५३ बाल विवाह झाल्याचे आढळून आले आहे. मार्च २०२३ मधील मासिक प्रगती अहवालानुसार कोकणातील( मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत) ११ हजार ५२८ बालके कुपोषित असल्याची माहिती या विभागाने दिली आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

10 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

11 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

13 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

13 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

14 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

14 hours ago