29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणढगाळ वातावरणाने इर्शाळवाडीमध्ये मदतकार्यास अडथळे, सिडकोचे १ हजार कर्मचारी एनडीआरएफच्या मदतीला

ढगाळ वातावरणाने इर्शाळवाडीमध्ये मदतकार्यास अडथळे, सिडकोचे १ हजार कर्मचारी एनडीआरएफच्या मदतीला

ढगाळ आणि सततच्या पावसामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्यास, हवाई मदत देण्यास रायगड जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या जवानांना अडचणी येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या दुर्घटनेत मृत्यू पडलेल्यांची संख्या १० असून ४ जखमी आहेत. तसेच पाऊस खूप पडत असल्याने ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असून त्यांना मदत पोहचवण्यासाठी अडचणी येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मदत कार्यात एनडीआरएफच्या जवान मंडळीना मदत करण्यासाठी सिडकोचे १ हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. इर्शाळवाडीमध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ३ बॉब कट मशीन पुरवल्या आहेत. यातील एक मशीन उपलब्ध झाली असून दोन लवकर येतील, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. यात दहा जण मृत्युमुखी पडले. ४ जखमी झाले असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या वस्तीवर बुधवारी रात्री साडे अकरा ते बारा ही घटना घडली. ही ५० ते ६० घरांची वस्ती असून इर्षालगड डोंगरावरील काही भाग कोसळल्याने जीवितहानी झाली आहे. मुसळधार पाऊस पडत असताना ही दुर्घटना घडली. प्रशासकीय यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, २०-२५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. या वाडीत घरे ४६ आहेत. हे गाव आदिवासीचे आहे
NDRF घटनास्थळी आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांना मोठा धक्का; नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदार, प्रदेश कार्यकारिणी अजित पवारांच्या गळाला

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजन करणारा शहाणा कोण ? जंयत पाटलांचा खडा सवाल

बाळासाहेब थोरातांनी दोनच दिवसात पावसाळी अधिवेशन गाजवले  

ढिगाऱ्याखाली किमान ३६ व्यक्ती असाव्यात. मात्र, नेमका अंदाज आलेला नाही.पाऊस, चिखल याचा मदत कार्यात अडथळा येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन रात्री या गावी पोहचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे घटनास्थळी आले. ते दिवसभर या गावी आहेत. रायगडचे पालकमंत्री सामंत हेही दुर्घटना स्थळी आहेत.

 

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी