महाराष्ट्र

वनमंत्री मुनगंटीवार यांनी घडविला चमत्कार; महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० च्या पार !

महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. देशातील वाघांच्या एकूण संख्येत महाराष्ट्रातील तब्बल ४०० वाघांचा समावेश असल्याचे केंद्रसरकारने नुकत्याच केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. व्याघ्र संवर्धन आणि वन व्यवस्थापन क्षेत्रात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने केलेल्या या उत्तम कामगिरीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ मध्ये राज्याचे वनमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० इतकीच होती. ही संख्या वाढविण्यासाठी त्यांनी वन्यजीव व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. वाघांची शिकार रोखून त्यांचे संवर्धन आणि सुरक्षेची हमी घेतली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील सर्व जंगलांमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.

केवळ भारतातीलच नव्हे तर देशाबाहेरील पर्यटकही महाराष्ट्रातील जंगलाकडे आकर्षित होतील, यासाठी वनमंत्र्यांनी प्रयत्न केले. व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृतीचे उपक्रम राबविले. त्यामुळे राज्यातील वाघांची संख्या दुप्पट झाली.

सध्या वाघांची संख्या ४०० च्या आसपास आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच २०० पेक्षा जास्त वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, बोर, उमेर-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले.

हे सुद्धा वाचा

पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरू केला चहाचा ब्रॅंड

मालवणीची ‘दगडफेक-दंगल’ पूर्व नियोजित; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

गोमूत्र मानवी आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या नव्या अहवालातील धोके अन् फायदे  

‘बिग बी’ अमिताभ बच्चन बनले व्याघ्रदूत !

व्याघ्रसंवर्धन जनजागृतीसाठी मुनगंटीवार यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत होण्याची विनंती केली. अमिताभ बच्चन यांनी ती मोठ्या आनंदाने स्वीकारून व्याघ्रसंवर्धन मोहिमेत सर्वसामान्य जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले. व्याघ्रसंवर्धनासाठी आपल्या आवाजाचा आणि चेहऱ्याचा वापर होत असल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी मुनगंटीवार यांच्याकडे आनंद व्यक्त केला होता.

Team Lay Bhari

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

13 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

14 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

16 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

16 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

17 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

17 hours ago