33 C
Mumbai
Monday, April 29, 2024
Homeगोमूत्र मानवी आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या नव्या अहवालातील धोके अन् फायदे
Array

गोमूत्र मानवी आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या नव्या अहवालातील धोके अन् फायदे

आपल्या देशात गाईला गौमाता म्हणून पूजले जाते. त्यामुळे गाईच्या दुधापासून ते गोमुत्रापर्यंत अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. गोमूत्रात विशेष प्रकारचे घटक आढळतात, ज्यामुळे 80 असाध्य रोग आणि अनेक आरोग्याशी संबंधित अनेक आजार बरे होतात. मात्र अलीकडेच देशातील नामवंत संस्था The Indian Council of Agricultural Research (ICAR) आणि इंडियन वेटेरिनरी रिसर्च इंस्टिट्यूटनं नुकत्याच प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार काही धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे.

एक निरोगी गायी आणि बैलांच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये कमीतकमी 14 प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात, ज्याचे सेवन केल्याने पोटाचे संसर्ग होऊ शकतात. गाईच्या ताज्या गोमूत्रात संभाव्य हानिकारक जीवाणू आढळून येतात. जे थेट मानवी वापरासाठी योग्य नसतात. त्याचप्रमाणे काही बॅक्टेरियांवर म्हशीचे मूत्र अधिक प्रभावी असते, असे त्यांच्या संशोधनातून नमूद करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थानच्या (IVRI) एका रिसर्चमधून हा खुलासा करण्यात आला आहे. या अभ्यासाचे प्रमुख भोजराज सिंह यांनी तीन पीएचड विद्यार्थांनाही यात सहभागी करून घेतले. या संपूर्ण संशोधनात अभ्यासकांनी तीन प्रकारच्या गायींचे लघवीचे नमुने गोळा केल्याचे संशोधनात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या संशोधनात साहिवाल, थारपारकर, विंदवी या प्रजातीच्या गायी होत्या. यासोबतच म्हशींच्या लघवीचे नमुनेही घेतले गेले.

गाईचे दूध हे जीवाणूविरोधी असते. पण याचा अर्थ आपण गोमूत्र सेवन करावे असा अजिबात होत नाही. संशोधनानुसार मानवांसाठी ते फारसे चांगले नाही. त्याचप्रमाणे गायीच्या प्युरिफाईड युरीनमध्ये अत्यंत घातक बॅक्टेरिया असतात की, नाही यावर संशोधन सुरू असल्याचेही भोजराज सिंह यांनी स्पष्ट केले. आयव्हीआरआयचे माजी संचालक आर.एस. चौहान यांनी सांगितले होते की, प्युरिफाईड गोमूत्र कर्करोग आणि कोविडशी लढण्यासाठी प्रभावी आहे. रक्त शुद्धीकरण, सांधेदुखी, पोटाशी संबंधित समस्या, हृदयविकार, रोगप्रतिकारक शक्ती, डोळ्यांची समस्या, केसांच्या समस्या यावर गोमूत्र फायदेशीर ठरत होते. मात्र नव्या अहवालामुळे नगरिकांपुढे खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा:

मोबाईल चोरीला गेलाय? हे काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा

डॉ. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हते; जाणून घ्या महामानवाच्या खास गोष्टी

भारतातील खऱ्या समजल्या जाणाऱ्या गोष्टींमागील सत्य!

भोजराज सिंह यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी विशेष संवाद साधताना सांगितले की, ‘या संपूर्ण संशोधनाचा निष्कर्ष काढण्यासाठी आम्ही गाई आणि म्हशींचे 73 मूत्र नमुने गोळा करून सांख्यिकीय संशोधन केले आहे. ज्यामध्ये आम्हाला आढळले की गोमूत्रापेक्षा म्हशीचे मूत्र जास्त फायदेशीर आहे. S Epidermidis आणि E Rhapontici सारखे जीवाणू म्हशीच्या लघवीमध्ये अधिक प्रभावी असतात.’ तर या संशोधनातील धक्कादायक बाब म्हणजे निरोगी गायींच्या दुधात किमान 14 प्रकारचे जीवाणू आढळून आले. ज्यामुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका असतो. हे संपूर्ण संशोधन रिसर्चगेट या ऑनलाइन पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले आहे.

Cow urine unfit for humans, says top animal research body IVRI

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी