महाराष्ट्र

MNS : नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली आम्हाला संपर्क साधा!

टीम लय भारी

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आला (MNS Sandeep Deshpande) आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा महिना सुरु आहे. सर्व कंपन्या बंद असल्यामुळे लाखो तरुणांच्या नोक-या गेल्या आहेत. काही तरुणांचा पगारही मिळाला नाही. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशा सर्वांसाठी काम करणार आहे. त्यासाठी मनसेने एक नंबरही जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी याबाबतचा एक व्हिडीओही ट्विटरवर पोस्ट केला (MNS Sandeep Deshpande) आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, “लॉकडाऊनमुळे आपली पूर्ण अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे. त्यामुळे लाखो मराठी मुलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींच्या नोकऱ्या जात आहेत. त्याचप्रमाणे अनेकांचे उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. उद्योजकांकडे पैसे नाहीत. पगार द्यायला पैसे नाहीत. लोकांकडे नोकऱ्या नाहीत. या सर्व अडचणींचा सामना करण्यासाठीच आम्ही एक नंबर जाहीर करत आहे. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांनी यावर आम्हाला संपर्क साधावा.”असंही आवाहन केलं आहे.

20-20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर होतात. पण प्रत्यक्षात मिळतोय ठेंगा…

केंद्रातून 20-20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर होतात. पण प्रत्यक्षात उद्योग क्षेत्राला काय मिळते. ठेंगा”, असंही देशपांडे म्हणाले.“मुलांच्या नोकऱ्या जात असताना सरकार त्यांना ठोस आश्वासन किंवा नोकऱ्यांवरुन काढणाऱ्या त्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई का करत नाहीत. माझी सर्वांना अशी विनंती आहे की, ज्यांच्या नोकऱ्या जात आहेत. ज्यांचे उद्योग धंदे बंद होत आहेत किंवा ज्यांच्या पगारात कपात केली जात आहे, अशा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा नंबर आम्ही तुम्हाला देत आहोत. या नंबरवर आपण फोन करावा आणि आपली माहिती त्यांनी आम्हाला द्यावी. जेणेकरुन ही सर्व माहिती गोळा करु. कारण आपल्याला माहिती आहे सरकार याबाबत कोणताही सर्व्हे करत नाही. फक्त फेसबुकवर येऊन बोलत आहेत. पण कुठलाही सर्व्हे करत नाही”, असं देशपांडे म्हणाले.

उद्योगधंद्याना ही केली विनंती….

“माझी अनेक उद्योगधंद्याना विनंती आहे की ज्यांना कामासाठी लोकं, कामगार लागणार असतील त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क साधावा. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना आम्ही या नोकऱ्या देऊ. तसेच ज्यांना बँका उभे करत नाही अशाही सर्वांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा”, असंही देशपांडे यांनी सांगितले.

mns-sandeep-deshpande-talk-on-job-and-business-lost-during-lockdown

राजीक खान

Recent Posts

पंचवटी आणि नाशिक पूर्व मध्ये हॉकर्स व पथविक्रेत्यांवर कारवाई

महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतीच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व…

20 seconds ago

मोदी सरकारचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी : अतुल लोंढे

कांदा (Onion) निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी…

26 mins ago

पंतप्रधानांविषयी बेताल वक्तव्ये करणा-या राहुल गांधींना मतदार धडा शिकवतील; केशव उपाध्ये

सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी व अवमानकारक उल्लेख करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी…

46 mins ago

गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही: नाना पटोले

लोकसभेच्या निवडणुकीचा (  Lok sabha election 2024 ) दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष…

1 hour ago

नवनीत राणाने शिवसेनेलाच नाचवले !

एका महिला उमेदवाराबाबत खालच्या पातळीवर टिका करुन उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेलाच अडचणीत…

20 hours ago

नाशिक जिल्ह्यातील चाडेगावात गोळीबार : सराईत गुन्हेगार फरार

नाशिक जिल्ह्यातील चाडेगावची ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने वर्गणीसाठी बैठक झाली. बैठकीनंतर चाडेगाव फाट्यावरील हॉटेलबाहेर एकाने…

1 day ago