महाराष्ट्र

‘गोली मारो सालों को, ‘ट्रम्प’च्या कानावर पडलं असावं- जितेंद्र आव्हाड

लय भारी टीम

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेतील वर्णव्देषावरून भाजपला टोला लगावला आहे. जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर जनक्षोभ उसळला असून, अमेरिकेत वर्णद्वेषावरून प्रचंड हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसक झालेल्या आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. ‘ट्रम्प यांनी भारत दौऱ्यात कानावर पडलेल्या विधानामुळे ते वक्तव्य केलं असावं,’ अशी टीका आव्हाड यांनी भाजपावर केली आहे.

काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प…

मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉइड यांना अटक करताना पोलीस अधिकाऱ्यानं त्यांची मान गुडघ्यानं दाबून धरली होती. यात त्यांचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा उद्रेक झाला. या हिंसाचारानंतर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. ट्रम्प यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.

“ट्रम्प म्हणतात अमेरिकेत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. ‘नमस्ते ट्रम्प’साठी आले होते, तेव्हा ‘गोली मारो सालों को’ कानावर पडलं असावं. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांची लोकांसाठी केलेली व्यवस्था असे अमेरिकेमध्ये म्हटलं गेले तिथेच आता गोली मारो सालो को,”अशा शब्दात आव्हाड यांनी ट्रम्प यांच्याबरोबर भाजपालाही टोला लगावला आहे. ट्रम्प म्हणतात अमेरिकेत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. “नमस्ते ट्रम्प” साठी आले होते तेव्हा “गोली मारों सालों को”

कायं म्हणाले होते भाजपचे नेते ?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा विरूद्ध आप अशी लढत बघायला मिळाली होती. या निवडणुकीत आपनं मोठं बहुमत मिळवलं. परंतु या निवडणकुीत प्रचाराची पातळी प्रचंड घसरलेली बघायला मिळाली. या प्रचारादरम्यान भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी एका सभेत हे विधान केलं होतं.

राजीक खान

Recent Posts

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

1 hour ago

मराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

   मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका.…

2 hours ago

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

3 hours ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

6 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

7 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

7 hours ago