‘सरकारमधील लोक खोटे बोलण्यात पटाईत,’ नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

राज्यातील आरक्षण प्रश्न, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था अश्या अनेक प्रश्नांच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी, (30 ऑटोबर) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिले. राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कमी पावसामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांसारखे प्रकार वाढत चालले आहेत. तसेच, अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघडे पडल्यामुळे राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्नही गंभीर बनला आहे, या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी, “सरकारमधील लोक खोटे बोलण्यात पटाईत असल्याने राज्य सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही,” असे व्यक्तव्य नाना पाटोले यांनी केले.

यावेळी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले, “मराठा समाजात असंतोषाची भावना असून उद्रेक होईल अशी स्फोटक परिस्थिती आहे. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड झाले आहे, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून मराठा समाजातील तरूण आत्महत्या करत आहेत. राज्यपाल महोदय हे केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा आहेत त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी आरक्षण विषयावर बोलावे तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलून त्यांनाही आश्वस्त करावे. जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे, अघटीत घडू नये यासाठी मध्यस्थी करा व प्रश्न सोडवा अशी विनंती करण्यात आली आहे.”

ते पुढे म्हणाले, “सरकार सकारात्मक तोडगा काढणार असेल तर आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेऊन सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु सरकारमधील घटक पक्षच एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत, तिघांनी सामूहिक जबाबदारी घेतील पाहिजे. या सरकारमधील लोक खोटे बोलण्यात पटाईत असल्याने राज्य सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही म्हणून विशेष अधिवेशनापूर्वी आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा सार्वजनिक करावा.”

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते म्हणाले, “राज्यात दुष्काळ आणि शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत पण राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सप्टेंबर महिन्यापासूनच राज्यातील विविध जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असून यात दररोज वाढ होत आहे. कमी पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यातील खरीप पीकं गेली आहेत तर रब्बी हंगामाची स्थितीही फारशी चांगली नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. दिवाळीचा सण आठ-दहा दिवसांवर आला आहे आणि शेतकऱ्याचे हात मात्र रिकामे आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी उजळून निघाली पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत दिली पाहिजे.”

हे ही वाचा 

मराठा आरक्षणाप्रश्नी खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाप्रश्नी आदित्य ठाकरे सरकारवर संतापले

जरांगे-पाटील म्हणाले, मैं खपाखप बोलता, घोडे लगाता…

“राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात मोठ्या प्रामणात अंमली पदार्थांचे साठे सापडले असून तरुण पिढीमध्ये हे विष पसरवून त्यांना बरबाद करण्याचे काम करणाऱ्यांवर जरब बसली पाहिजे. याप्रकरणी ड्रग माफियांचे रॅकेट उद्ध्वस्थ करणे गरजेचे आहे. महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. बेरोजगारीचा प्रश्नही मोठा आहे, राज्यात लाखोंच्या संख्येने तरुण बेकार आहेत. राज्यातील आरोग्य सेवा कोलमडलेली असून शासकीय रुग्णालयात नवजात बालकांसह मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याची घटना आरोग्य सेवेचे धिंडवडे काढणारी आहे. हे सर्व ज्वलंत प्रश्न राज्यातील जनतेच्या हिताचे आहेत असे नाना पटोले म्हणाले.”

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago