27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाप्रश्नी खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

मराठा आरक्षणाप्रश्नी खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाप्रश्नी चाललेल्या आमरण उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण आता चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने आता लवकरात लवकर पावले उचलावित यासाठी आणि जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा आंदोलकांकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. यातच, शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी, आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार हेमंत पाटील यावेळी म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही. राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनाना देत आहे.”


राज्यभर मराठा समाजामध्ये मराठा आरक्षणावरून संतापाचे वातावरण आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर, त्यानंतर, 1 सप्टेंबर रोजी अंतरवली सराटी गावातील आंदोलक गावकऱ्यांवर पोलिसांतर्फे लाठीचार्ज करण्यात आला होता. यामुळे, राज्य सरकारला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर, राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्याकडे उपोषण सोडण्याची विनंती करून आरक्षणाबाबतीत तोडगा काढण्यासाठी वेळ मागितला. तेव्हा, 14 सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडत सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटाम दिला. परंतु, 40 दिवसांनंतरही राज्य सरकारने निर्णय न घेतल्यामुळे 25 ऑक्टोबरपासून जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनास सुरुवात केली.

हे ही वाचा 

मराठा आंदोलन: विशेष अधिवेशनसाठी विरोधक आग्रही; राज्यपालांची घेतली भेट

जरांगे-पाटील म्हणाले, मैं खपाखप बोलता, घोडे लगाता…

मराठा आरक्षण झाले सोपे, १५ हजार कागदपत्रांमुळे आशा पल्लवीत…

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सोमवार, (30 ऑक्टोबर) रोजी सहावा दिवस असून काही ठिकाणी आंदोलनाचे स्वरुप उग्र झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच, हेमंत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आणि समाजाच्या भावना लक्षात घेत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील यांचा या कृतीमुळे मराठा समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी