नाशिक पुणे रोडवर गावठी कट्टे विकणारे तीन तरुण अटकेत

नाशिक पुणे रोडवर गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच त्यांनी गावठी कट्टा घेऊन आलेल्या दोघांना शिताफीने अटक करून त्यांच्या अजून एका साथीदाराला ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या तिघा संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा इमरान शेख करीत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह कारवाई करताना पोलिसांना हि माहिती मिळाली. त्यांनतर पोलिसांनी सापळा रचून हि कारवाई केली.

नाशिक जिल्हयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर

 

नाशिकमध्ये मराठा बांधवांनी केला जल्लोष

 

नाशिकमध्ये दोन दिवसात एक लाख घरांचे सर्वेक्षण

 

या दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोशि. जयंत शिंदे, पोहवा गुंड यांना नाशिक पुणे रोडवरील इच्छामणी लॉन्स, जवळील मैदानाजवळ एक संशयित गावठी कट्टा आणि काडतूस घेवून येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती.
मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली असता त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि चौधरी, पोहवा शेख, पोशि. जयंत शिंदे, पोशि. अनिल शिंदे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या पथकाने घटनास्थळी जाऊन सापळा रचत संशयित शुभम अशोक जाधव, २३, रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक, सचिन धर्मा सोनवणे, २४, रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ गावठी कट्टा आणि १ जिवंत काडतुस हस्तगत केले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या अजून एका साथीदाराचे नाव सांगितले त्यावरून पोलिसांनी संशयित गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी, २४, रा. सिध्दार्थ किराणा जवळ, समतानगर, नाशिक याला ताब्यात घेत त्याच्याकडून १ गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.
हि कारवाई पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासो दुकळे, सपोनि चौधरी, पोहवा लखन, इमरान शेख, पोशि जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुरज गवळी, पंकज कर्पे, राहुल जगताप, सौरभ लोंढे, संदेश रगतवान यांनी केली आहे.गेल्या काही मंहिण्यापासून या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत . उपनगर पोलिसांनी धडक कारवाई सुरु केल्याने परिसरातील नागरिकानी देखील समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ज्या टीमने हि कारवाई केली त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago