नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसात सुमारे एक लाख घरांमध्ये मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात महापालिकेचे सुमारे २७०० कर्मचारी सर्वेक्षण कामात व्यस्त असल्याने राजीव गांधी भवन येथे शुकशुकाट पाहायला मिळायला. त्यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. हा सर्वे ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी ४७ हजार घरांचे सर्वक्षण करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मुंबईतील आंदोलनासाठी एल्गार पुकारला आहे. त्यामुळे राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे.
कुणबी नोंदी तपासण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिल्ह्यांमध्ये ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्या सर्व पात्र कुटुंबांना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे दाखले तातडीने द्यावेत, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. जिल्ह्यात दोन लाख आठ हजार ४० कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर शहरात सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे २७०० सेवक प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हे ही वाचा
भाजपचे मुंबईवर अतिक्रमण, शिवसेनेच्या बैठकीत संताप !
अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाची सरकारकडे मागणी करताना दिसत आहेत. अशातच आता मनोज जरांगे हे आपले मराठा बांधव घेऊन मुंबईला कूच करत आहेत. सध्या ते लोणावळा येथे आहेत. यासाठी लोणावळा, पनवेल ते मुंबईच्या महामार्गावरून प्रवास करता येणार नाही. अशातच ते मुंबईला येणार असून काही दिवसांपासून नेत्यांनी त्यांना मुंबईमध्ये न येण्याचं आवाहन केलं आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
नाशिकप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाजाच्या कुणबी दाखल्याच्या नोंदी शोधायचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. राज्यातून अेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडत आहेत. नाशिकमध्ये दोन दिवसात १ लाख नोंदी काढण्यात आल्या आहेत. तर यामुळे आता नाशिक महापालिकेची धावपळ पाहायला मिळत आहे.