32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये मराठा बांधवांनी केला जल्लोष

नाशिकमध्ये मराठा बांधवांनी केला जल्लोष

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला ऐतिहासिक मोर्चा एपीएमसी वाशी मार्केट,नवीन मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला. हा ऐतिहासिक विजय मिळवल्या नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आज सर्वत्र जल्लोष करण्यात आला. रविवारी  सकाळी सीबीएस येथील शिवतीर्था वर नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पेढे वाटत तसेच फटाक्याच्या आतिषबाजी ने विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले असे कै.आमदार अण्णासाहेब पाटील,क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील,अण्णासाहेब येरळीकर ,प्रा. देविदास वडजे,कै.आमदार विनायक मेटे यांसह शेकडो समाज बांधव ज्यांनी बलिदान दिले त्या सर्वांना या विजया प्रसंगी हे श्रद्धांजली नाशिककरांच्या वतीने देण्यात आली.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला ऐतिहासिक मोर्चा एपीएमसी वाशी मार्केट,नवीन मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला. हा ऐतिहासिक विजय मिळवल्या नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आज सर्वत्र जल्लोष करण्यात आला. रविवारी  सकाळी सीबीएस येथील शिवतीर्था वर नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पेढे वाटत तसेच फटाक्याच्या आतिषबाजी ने विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले असे कै.आमदार अण्णासाहेब पाटील,क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील,अण्णासाहेब येरळीकर ,प्रा. देविदास वडजे,कै.आमदार विनायक मेटे यांसह शेकडो समाज बांधव ज्यांनी बलिदान दिले त्या सर्वांना या विजया प्रसंगी हे श्रद्धांजली नाशिककरांच्या वतीने देण्यात आली.

 

मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाची ठिणगी देशपातळीवर

मराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध ; देवेंद्र फडणवीस

 

मराठा मोर्चा मुंबईत धडकला

 

नाशिक जिल्ह्याच्या वतीने पहिल्यापासून एकमुखाने निर्णय घेण्यात आला होता की मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील हे जो ही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर नाशिक जिल्हा हा एक संघ राहून त्यांना साथ देत राहील त्यामुळे कालचा जो निर्णय मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी संपूर्ण नाशिक जिल्हा एकमताने सहमत असल्याचा ठराव यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी मांडला.
या ठरावाला उपस्थित सर्व समाज बांधवांनी हात वर करून एकत्रित संमती दर्शवली.
यानंतर सर्व समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज,जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां,महात्मा ज्योतिबा फुले यांसह थोर महापुरुषांच्या नावाने विजयी जयघोष केला.

ओबीसीतून आरक्षण घेण्यापासून अडवणाऱ्यांनी कितीही अडविले तरी ते मराठ्यांनी मिळविले,एक मराठा लाख मराठा,मराठा योद्धा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत विजयाचा गुलाल एकमेकांच्या अंगावर उधळला गेला.तसेच आरक्षणासाठी सलग 105 दिवस लाक्षणिक उपोषण व सहा दिवस अमरण उपोषण करणारे नानासाहेब बच्छाव व त्यांच्या बरोबर त्यांना साथ देणारे समाज बांधव बंधू-भगिनी यांचा देखील सत्कार सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सामूहिकरीत्या करण्यात आला.
यावेळी हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

अनेक वर्षांपूर्वीचा मराठ्यांचा वनवास हा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी संपवला त्याबद्दल नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त करतो तसेच हे आंदोलन व न्यायिक लढाईत मराठे विजयी झाले त्याच पद्धतीने पुढील काळात मराठा योद्धा जरांगे पाटील ज्या ज्या वेळेस आवाज देतील त्या त्या वेळेस न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी अशाच मोठ्या ताकदीने उभे राहतील.या लढ्यामध्ये ज्या समाज बांधवांनी योगदान दिले त्या सर्व समाज बांधवांचे तसेच या लढ्यासाठी पाठिंबा दिलेल्या सर्व बहुजन समाज बांधवांचे नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो.
व येणाऱ्या काळात मराठ्यांची ही एकजुट अशीच टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध व एक संघरहू असा संकल्प आजच्या दिवशी करतो.
-करण पंढरीनाथ गायकर,मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक.

-हा मराठा समाजाच्या एकीचा विजय आहे समाजाला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलां सारख प्रामाणिक नेतृत्व मिळाल्यामुळे समाजानेही या नेतृत्वाला साथ देत आज हा आरक्षणाचा लढा विजयाच्या रुपात परावर्तित करून समाजाचा अनेक वर्षाचा वनवास संपवला मराठा योद्धा जरांगे पाटील ज्या ज्या वेळेस समाजाबद्दल काही भूमिका घेतील त्या त्या वेळेस आम्ही ताकतीन सर्व त्यांच्यासोबत उभे राहून तळागाळातील घटक वर्गाला न्याय देण्यासाठी या पुढे सकल मराठा समाजाचा लढा असेल.
नानासाहेब बच्छाव- समन्वयक मराठा क्रांती मोर्चा

हा आनंदोत्सव प्रसंगी करण्यासाठी करण गायकर,नानासाहेब बच्छाव,शिवाजी सहाणे,चंद्रकांत बनकर,हंसराज वडघुले,नितीन रोटे पाटील,डॉ.सचिन देवरे,योगेश नाटकर सोमनाथ जाधव,संजय फडोळ,मामा राजवाडे,राम खुर्दल,हर्षल पवार,वैभव दळवी निलेश मोरे,बाळासाहेब लांबे कैलास खांडबहाले,मुरलीधर पाटील,सचिन पवार,नितीन काळे,संदीप हांडगे,गौरव गाजरे,अजित नाले,ज्ञानेश्वर कवडे,निलेश टुबे,विकी गायधनी,शरद लबडे,उल्हास बोरसे,वत्सलाताई खैरे एकता खैरे,शिल्पा चव्हाण,रोहिणी उखाडे,ममता शिंदे,अड स्वप्ना राऊत,संगीता सूर्यवंशी,सविता रूपाली काकडे,दिपाली लोखंडे,स्वाती कदम,माधवी पाटील,स्वाती जाधव, प्रमिला चौरे,ज्ञानेश्वर सुराशे,संदीप खूठे,राम निकम,प्रफुल वाघ,अजित नाले,विक्रांत देशमुख,भारत पिंगळे,हार्दिक निगळ,मंगेश गोडसे नितीन तांबे राम गहिरे अण्णासाहेब पिंपळे,हिरामण वाघ बापू चव्हाण विकी गायधनी विष्णू अहिरे खंडू आहेर उमेश पवार,उदय देशमुख महेंद्र बेरे यांसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी