नाशिक जिल्ह्यात शरद पवार गट लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदारपणे कामाला लागल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी नाशिक शहरात दोन दिवस मुक्काम करत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शेतकरी मोर्चा काढत नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला होता. त्या मागोमाग शरद पवार यांनी स्वतः कांद्याच्या दरा संदर्भात झालेल्या आंदोलनात आपला सहभाग दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर काल नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील नवीन तरुणांना शरद पवार गटाच्या विद्यार्थी संघटनेतील जबाबदाऱ्या देत लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार जाधव यांनी संघटनेच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर करत नियुक्ती पत्रांचे वाटप केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की, नवीन पदाधिकाऱ्यांनी संघटन, उपक्रम, आंदोलन या त्रिसूत्रीवर काम करत पक्षाचा विस्तार करायला हवा. विद्यमान सरकार हे विद्यार्थी विरोधी सरकार आहे. एका बाजूला उत्तर भारतातील परीक्षा घोटाळ्यांचा पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला पाठीमागच्या दारातून कंत्राटी भरती प्रत्येक विभागात सुरू आहे. त्यातून भाजप आपल्या हिताच्या लोकांना शासकीय व्यवस्थेत सहभागी करुन घेत आहे आणि त्या माध्यमातून शासकीय यंत्रणांचा ताबा घेत आहे. राज्यातील कंपन्या गुजरातला पळवल्या जात आहेत. संशोधक विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची आधीछात्रवृत्ती नाकारली जात आहे. सांस्कृतीक अस्मितेच्या इव्हेंटच्या आड विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. अशी टिका प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी केली.
हेही वाचा
मनोज जरांगेंच्या सरकारकडे ‘या’ मागण्या
आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल!, मनोज जरांगे-पाटलांची मुख्यमंत्र्यांना गळाभेट
काळा घोडा, मुंबई महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; नक्की भेट द्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार आणि प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नवीन तरुणांनी शरद पवारांनी केलेले काम समजून घेतले पाहिजे व ते नव्या पिढीला समजावून सांगायला हवे. आगामी लोकसभा निवडणुकीत युवा पिढीवर महत्त्वाची जबाबदारी असून प्रचाराची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी. जिल्हाध्यक्ष म्हणून नवीन पिढीला संधी देण्याची भूमिका पुढील निवडणुकांत घेतली जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन (नाना) शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळनाना पिंगळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई पवार, विद्यार्थी जिल्हा निरीक्षक प्रदेश सरचिटणीस सौरभ देशमुख, प्रदेश सरचिटणीस वेदांशु पाटील, प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील, विद्यार्थी शहराध्यक्ष भावनेश राऊत, विद्यार्थी लोकसभा कार्याध्यक्ष करण आरोटे व मोठ्या संख्येने विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन पदाधिकारी यादी
जिल्हा कार्यकारणी
– जय दिनकर पाटील (जिल्हा सरचिटणीस)
– करण बाळासाहेब आरोटे(नाशिक लोकसभा कार्याध्यक्ष)
– अक्षय अनिल भोसले (जिल्हा उपाध्यक्ष)
– नितीन सुरेश मांडवडे (जिल्हा उपाध्यक्ष)
– रोशन शंकर अपसुंदे (जिल्हा उपाध्यक्ष)
– किरण भावसिंग पवार (जिल्हा सरचिटणीस)
– आकाश संजय आहेर (जिल्हा उपाध्यक्ष)
– अमोल संजु सुर्यवंशी (जिल्हा सरचिटणीस)
तालुका कार्यकारणी
– यश रवीकिरण निकम (देवळा तालुका अध्यक्ष)
– अभिजित सुनिल ठाकरे(चांदवड तालुका अध्यक्ष)
– सार्थक नामदेव निखाडे( दिंडोरी तालुकाध्यक्ष)
– तेजस उत्तम भोर (ईगतपुरी तालुका अध्यक्ष)
– अमित देविदास शिंदे(येवला तालुकाध्यक्ष)
– पियुष राजेंद्र सोनवणे (सटाणा तालुकाध्यक्ष)
– प्रफुल्ल अशोक सावले(देवळा शहराध्यक्ष)
– शुभम सुभाष निकम (देवळा तालुका कार्याध्यक्ष)
– सुनिल कैलास कोकरे(देवळा तालुका उपाध्यक्ष)
– दिंगबर बापु सोनवणे(कळवण शहराध्यक्ष)
– अजित दिपक बोराडे (नांदगाव तालुकाअध्यक्ष)
– तेजस केदा मांडवडे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख)
यांची निवड यावेळी करण्यात आली.