उत्तर महाराष्ट्र

नाशिक मध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाशिक शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या (gas cylinders) काळाबाजाराचा भांडाफोड केला आहे. याबाबतचे व्हिडीओ चित्रीकरण पोलीस प्रशासनाला दाखवत संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे. मात्र, यामध्ये पोलीस प्रशासनातील झारीतील काही शुक्राचार्यांनी काळाबाजार करणाऱ्यांना वेळीच टीप दिल्याने कालपर्यंत उघड सुरु असलेल्या ठिकाणी पोलीस छाप्यादरम्यान काहीच मिळून आले नाही.(Black market of gas cylinders busted in Nashik)

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील घरगुती (१४.२ किग्रॅ) ग्राहकांचे हक्काचे गॅस सिलेंडरचा अवैध वापर नाशिक शहरातील एलपीजी वाहन चालक वाहनात भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ या महिन्यात लेखी पत्राद्वारे पुरवठा विभागाला कळविले होते. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरु असल्याचे दिसत होते. यामुळे शहरात कधीही मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला असून त्यावर कार्यवाही मोहीम राबविण्यात यावी अश्या मागणीचे पत्र १९ मार्च २०२४ रोजी देण्यात आले होते.

ग्राहक दक्षता कल्याणच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रांची दखल घेत पुरवठा विभागाने संबंधित विभागांना पत्र काढत कार्यवाही करण्यात यावी असे सूचित केले होते. हि कार्यवाही न केल्यास व काही अघटित या मोठी दुर्घटना होवून जीवित व वित्त हानी झाल्यास त्याची संपूर्ण प्रशासनाची राहणार असल्याचे कळविले होते. त्याअनुषंगाने घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी व वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास पाठवावा असे पुरवठा विभागाकडून तहसीलदार, धान्य वितरण अधिकारी, सर्व गॅस कंपनी विक्री अधिकारी कळविण्यात आले होते. मात्र, तरीही महिनाभरानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने शेवटी ग्राहक दक्षता कल्याणच्या काही अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये येऊन पंचवटी परिसरातील चिंचबन, कर्ण नगर, निलगिरी बाग, गंजमाळ, खडकाळी सिग्नल, मीरा दातार दर्गा परिसरात येऊन गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. हे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना गुरुवार दि. २५ रोजी भेटून दाखविण्यात आले होते. त्यावर कर्णिक यांनी संबंधित ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते.

शुक्रवार दि. २६ रोजी सकाळच्या सुमारास पंचवटी पोलिसांनी चिंचबन परिसरात छापा टाकला मात्र, याठिकाणी संबंधित काळा बाजार करणाऱ्या संशयिताने सर्व साहित्य गायब केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पेठरोडवरील कर्ण नगर परिसरात छापा टाकत गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रिक्षा क्रमांक एम. एच. १५ एफ. यु. ४६२६, आठ घरगुती गॅस सिलेंडर आणि एक मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत निलगिरी बाग येथे केलेल्या कारवाईमध्ये ९ घरगुती सिलेंडर, मोटार ताब्यात घेतली आहे. हि कारवाई पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्योती आमने, ग्राहक दक्षता कल्याणचे मेघा शर्मा, रोहित पवार, आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी वैशाली भिसे, गुन्हे शोध पथक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पंचनामा करणार कोण यावरून वाद – म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्ण नगर परिसरात पोलीस पथकाने छापा मारत दोन संशयितांकडून घरगुती सिलेंडर जप्त केले. मात्र, हद्द पंचवटी पोलीस ठाण्याची नसल्याने संशयितांसह मुद्देमाल जप्त करत त्यांना म्हसरूळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, येथील पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही कारवाई केली नसल्याने आम्ही पंचनामा करणार नसल्याचे सांगत हात वर केले. तर कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक गेल्याने त्यांनी घटनास्थळ आमच्या हद्दीत नसल्याचे सांगत पंचनामा करण्यास नकार दिल्याने ग्राहक दक्षता कल्याणच्या अधिकाऱ्यांना डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली होती. पोलिसांच्या या वादामुळे नेमकी कारवाई कोणावर आणि किती मुद्देमाल जप्त केला याची माहिती उशिरापर्यंत समजू शकली नाही.

नाशिकमध्ये ज्याठिकाणी घरगुती सिलेंडर सापडले आहे. त्याची सखोल चौकशी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी करणे गरजेचे आहे. तसेच, चौकशी दरम्यान हे घरगुती सिलेंडर ज्या एजन्सीने काळाबाजार करणाऱ्यांना दिले असेल त्यांचे परवाने रद्द करून कठोर कारवाई करावी.  मेघा शर्मा, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन

टीम लय भारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

7 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

7 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

9 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

11 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

11 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

12 hours ago