उत्तर महाराष्ट्र

ST Bus : संतप्त प्रकार, महामार्गावर अंधारात लाईटविना धावली एसटी बस

रात्रीच्या वेळी धावणाऱ्या एसटी बसेसचे (ST bus) किमान पुढचे आणि मागचे लाईट सुरु राहतील, अशी प्रवाशांची माफक अपेक्षा असते. मात्र प्रवाशांची ही माफक अपेक्षा कर्तव्यदक्ष एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमपणामुळे फोल ठरली आहे. याचा प्रत्यय धुळ्यामध्ये 18 ऑगस्ट रोजी रात्री प्रवाशांना आला. प्रवासी ज्या एसटी बसमध्ये बसले होते त्या बसचे पुढचे लाईटच सुरु होत नसल्याचा प्रकार प्रवाशांचा लक्षात येताच प्रवाशांनी चालकाला दोष न देता एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला. यावेळी चालकाची एसटी चालविताना होत असलेली कसरत लक्षात घेत एसटी चालकाला मदत केली. तसेच एसटीची हेड लाईट दुरुस्त करूनच पुढचा प्रवास करू असा पवित्रा यावेळी एसटी बसमधील प्रवाशांकडून घेण्यात आला. या उघडकीस आलेल्या घटनेमुळे एसटी बस प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी तर खेळत नाही ना ? असा संतप्त प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

सध्या सोशल मीडियावर नाशिक – धुळे (बस क्रमांक – एमएच – 20- बीएल 3467) या विनावाहक बायपास एसटी बसचा व्हिडीओ वायरल झाला आहे. हा व्हिडीओ 18 ऑगस्टचा असल्याची चर्चा करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये एसटी बसचे पुढचे हेड लाईट बंद असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावेळी या एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना सुखरूप नेण्यासाठी एसटी चालकाने अंधारात रस्त्याचा अंदाज घेत जवळच्या एका खाजगी गॅरेज पर्यंत बस नेली आणि मुंबई -आग्रा महामार्गावरील सोग्रस फाट्याजवळ चालकाने बस थांबवून स्वतः जाऊन गॅरेजवाल्याचा शोध घेतला, असेही सांगण्यात येत आहे.

प्रवाशांनी चालकाला केले सहकार्य
यावेळी बसमधील प्रवाशांनी एसटी बस चालकाला सहकार्य केले. बस चालकाने खाजगी गॅरेज वाल्याकडून बंद हेड लाईट सुरु करून घेतले. सदर बस ही नाशिकवरून धुळ्याकडे जात होती, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बसचे केवळ पुढचे हेड लाईटच बंद नव्हते तर मागील बाजूस असलेले लाईट देखील बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar Speech : अजितदादा म्हणाले, मी असा झापेन की…

Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलन करत खेळले खेळ

MPSC Students : एमपीएससी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात अनोखे आंदोलन

दरम्यान, जर यावेळी एसटी बसचा अपघात झाला असता तर एसटी प्रशासनाकडून याचे खापर कोणावर फोडण्यात आले असते ? एसटी प्रशासनाचे मेंटेनन्स विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे का ? एसटी प्रशासन या मेंटेनन्स विभागातील अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार का ? असे अनेक प्रश्न जागरूक प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

उघडकीस आलेल्या या संतप्त प्रकारानंतर आता प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एसटी बस ज्यावेळी डेपोत जमा होते, त्यावेळी ड्युटीवरून उतरणारा चालक लॉगशीटवर त्या बसमध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे लिखित स्वरूपात देत असतो. त्या समस्येचे निराकरण संबंधित वर्कशॉपमधील अधिकारी, कर्मचारी किती प्रामाणिकपणे करतात ? याचे क्रॉस चेक होते का ?, बसची स्टेरिंग, पाटा, ऑइल सील, ब्रेक, गियर बॉक्स यांच्या नियमित तपासणीचे ऑडिट होते का ?, वर्कशॉप अर्थात ज्या ठिकाणी एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीचे काम होते, तेथील सीसीटीव्ही कार्यरत आहेत का ?, किती बसचे वायफर सुस्थितीत आहेत ?, रात्रीच्या वेळी नाईट शिफ्टला देखील एसटीचे मेंटेनन्स, दुरुस्ती होते का?, डे – नाईट शिफ्टच्या कामाची अचानक तपासणी करून पडताळणी होते का ?, किती बसेसच्या सीटची, खिडक्यांची अवस्था चांगली आहे ?, किती बसेस गळक्या आहेत ?, याचे देखील ऑडिट करून कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, जेणेकरून प्रवाशांचा जीव धोक्यात जाणार नाही, अशी अपेक्षा, मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे .

संजय सोनवणे, धुळे

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

19 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago