उत्तर महाराष्ट्र

विजय करंजकर आहेत ‘एवढ्या’ कोटींचे मालक

सध्या देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे  वारे वाहत असून सगळीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. यात महाराष्ट्रातील नाशिक लोकसभा  मतदारसंघ यंदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेद्वारांवरून चांगलाच चर्चेचा विषय ठरल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या  कोट्यातून नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या तर महायुतीच्या कोट्यातून शिंदेंच्या शिवसेनेच्या  वाट्याला आली आहे. यामध्ये महायुतीचा  उमेदवार अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्यादिवशी जाहीर करण्यात आला.तर महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या विजय करंजकर ( Vijay Karanjkar)  यांना डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली( Vijay Karanjkar is the owner of ‘so many’ crores)

तर महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या विजय करंजकर यांना डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात चांगलीच नाराजी पाहायला मिळाली. यामुळे आता या नाराजीचे रुपांतर लोकसभा निवडणुकीत बंडखोरीत झाले आहे.

विजय करंजकर (Vijay Karnajkar) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या निवडणुक अर्जासोबत आपल्याकडे किती कोटींची संपत्ती  आहे, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार करंजकर यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. तर करंजकर यांना अद्याप एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.

करंजकर यांनी प्रतिज्ञापत्रासोबत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, त्यांचे बारा बँकांमध्ये खाते आहेत. या खात्यांमध्ये २४.६७ लाख रुपये जमा आहेत. तर विजय करंजकर यांच्याकडे १२.५६ लाख तर पत्नी अनिता करंजकर यांच्याकडे २७.३८ लाख रुपये रोख रक्कम आहे. त्यासोबतच विविध सहकारी बँकांचे ८६, १०० रुपयांचे शेअर्स देखील करंजकर यांच्याकडे आहेत. याशिवाय करंजकर यांची मॅक्स लाइफ कंपनीची एक तर पत्नी अनिता करंजकर यांच्याकडे तीन विमा पॉलिसी असून त्यांचे एकत्रित मूल्य ६.६२ लाख आहेत. तसेच विजय करंजकर यांनी आपल्या पत्नीकडून दोन लाख रुपये आणि योगेश हरक यांच्याकडून ९.५० लाख रुपये उसणे घेतले आहेत.

दरम्यान, विजय करंजकर यांच्याकडे भगूर शहरात दहा शेत जमिनींसह बांधिव आणि अन्य निवासी मालमत्ता असून त्याची किंमत सुमारे २४ कोटी आहे. याशिवाय विजय करंजकर यांच्याकडे २४३० आणि पत्नी अनिता यांच्याकडे १५०० ग्रॅम असे पावणेतीन कोटी रुपयांचे सोने असून या सर्व संपत्तीची किंमत ३.९२ कोटी आहे. तसेच विजय करंजकर यांच्याकडे फॉर्च्यूनर, जीप, ट्रॅक्टर, फियाट या वाहनांसह बुलेट मोटरसायकल आणि एक स्कूटर देखील असून त्यांच्यावर दोन बँकांचे १६.३२ लाखांचे कर्जही आहे.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

13 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

14 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago