मुंबई : सातारा (Satara) शहरातील पोवई नाक्यावरुन पहाटे पाच बाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चार वर्षाच्या बालिकेचे अपहरण करुन शेंद्रे गावच्या हद्दीत नेऊन बलात्कार केल्याची घृणास्पद घटना 28 मार्च 2022 रोजी घडली. या घटनेने खळबळ उडाली असून याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस आरोपींच्या शोधात पथके रवाना झाली. (Rape of 4 year old girl from Pardhi community in Satara)
या घटनेबाबत सातारा जिल्हा अधिकारी ऑफिस समोर बोंबाबोब आंदोलन केले. हे आंदोलन सातारा (Satara) पारधी आणि दलीत समाजाचे अध्यक्ष उमेश चव्हान आणि सातारा जिल्हा पारधी समाज अध्यक्ष व महिला काँग्रेस प्रदेश कॉर्डीनेटर मीनाक्षी अनाजुरगी या दोघांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. आखिल भारतीय महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव वैशाली जाधव याशिवाय प्रदेश कॉर्डीनेटर जस्मिन खान यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.आखिल भारतीय महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी पारधी समाजातील लोकांना मदत करणार आहेत.
सातारा येथे रस्त्यावर झोपलेल्या 4 वर्षाच्या पारधी समाजातील चिमुरडीवर जो अत्याचार झाला त्या नराधमास Fastrack च्या कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळावी व या पारधींना राहण्यासाठी जागा मिळावी यासाठी या आंदोलनास वैशाली जाधव यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पारधी समाजातील लोकांना मदतीचा हात देऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन जी काही मदत लागेल ती मदत करून त्यांच्या मुलांना शाळा व हॉस्टेलची सोय करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर एसपी अजयकुमार बन्सी यांनी अत्याचार करणाऱ्या नराधमास गजाआड केले. म्हणून सर्व महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या वतीने वैशाली जाधव यांनी एसपी अजयकुमार बन्सी यांचे आभार मानले.
बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच केली दगडफेक
बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…