32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यात 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार : दोषी व्यक्तीस फाशीची शिक्षा आणि पारधींना...

साताऱ्यात 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार : दोषी व्यक्तीस फाशीची शिक्षा आणि पारधींना निवाऱ्याची वैशाली जाधव यांची मागणी

टीम लय भारी

मुंबई : सातारा (Satara) शहरातील पोवई नाक्यावरुन पहाटे पाच बाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चार वर्षाच्या बालिकेचे अपहरण करुन शेंद्रे गावच्या हद्दीत नेऊन बलात्कार केल्याची घृणास्पद घटना 28 मार्च 2022 रोजी घडली. या घटनेने खळबळ उडाली असून याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस आरोपींच्या शोधात पथके रवाना झाली. (Rape of 4 year old girl from Pardhi community in Satara)

या घटनेबाबत सातारा जिल्हा अधिकारी ऑफिस समोर बोंबाबोब आंदोलन केले. हे आंदोलन सातारा (Satara) पारधी आणि दलीत समाजाचे अध्यक्ष उमेश चव्हान आणि सातारा जिल्हा पारधी समाज अध्यक्ष व महिला काँग्रेस प्रदेश कॉर्डीनेटर मीनाक्षी अनाजुरगी या दोघांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. आखिल भारतीय महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव वैशाली जाधव याशिवाय प्रदेश कॉर्डीनेटर जस्मिन खान यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.आखिल भारतीय महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी पारधी समाजातील लोकांना मदत करणार आहेत.

मुलांना शाळा व हॉस्टेलची सोय करण्याची ग्वाही…

सातारा येथे रस्त्यावर झोपलेल्या 4 वर्षाच्या पारधी समाजातील चिमुरडीवर जो अत्याचार झाला त्या नराधमास Fastrack च्या कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळावी व या पारधींना राहण्यासाठी जागा मिळावी यासाठी या आंदोलनास वैशाली जाधव यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पारधी समाजातील लोकांना मदतीचा हात देऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन जी काही मदत लागेल ती मदत करून त्यांच्या मुलांना शाळा व हॉस्टेलची सोय करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर एसपी अजयकुमार बन्सी यांनी अत्याचार करणाऱ्या नराधमास गजाआड केले. म्हणून सर्व महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या वतीने वैशाली जाधव यांनी एसपी अजयकुमार बन्सी यांचे आभार मानले.


हे सुद्धा वाचा : 

Women safety project to be run across state

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच केली दगडफेक

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी