33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

टीम लय भारी

सातारा : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे (Ajit Pawar expressed grief over the demise of Balasaheb Bhilare).

महाबळेश्वर-पांचगणीच्या विकासासह पर्यटनवाढीसाठी त्यांनी तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. राजकीय, सामाजिक चळवळीची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. मी बाळासाहेब भिलारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भिलारे कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

धर्मनिरपेक्ष पक्षांचा जातीयवादी चेहरा उघड, जिल्ह्यावासीयांसमोर बुरखा फाटला

‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो : चंद्रकांत पाटील

गेले दीड ते दोन महिन्यापासून बाळासाहेब भिलारे हे अल्प आजाराने दवाखान्यात उपचार घेत होते. काही दिवसापूर्वी त्यांना बरे वाटत असल्याने त्यांना घरी आणण्यात आलेल्या आले होते परंतु रात्री अचानक तब्येत बिघडल्याने दादांना दवाखान्यात दाखल केले होते.  आज त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे महाबळेश्वरच्या राजकारणातला एक दृष्टा नेता. सदैव जनतेच्या तनामानात असलेला , जनतेच्या हितासाठी कायम झटणारा ,जनतेची आस्मिता जागवणारा नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.

सत्तेच्या खुर्चीवर राहूनही आपले पाय जमिनीवर ठेवणारी, सत्तेत नसतानाही समाजकारणात गढून गेलेली आणि आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम नाहीतर अगदी घट्ट ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. नुसत्याच सभा गाजवण्यापेक्षा तळागाळात विकासाची गंगा पोहोचवून त्या लोकांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी ठेवणारे ‘ लोकनेते ‘ आणि स्वतः आमदार झालो नाही तरी इतरांना त्या पदापर्यंत पोहोचवणारी ताकद निर्माण करणारे म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल असा नेता महाबळेश्वर तालुक्याला लाभला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय मा. बाळासाहेब भिलारे यांच आज निधन झाल्याची बातमी आली..मनाला ही गोष्ट पटेनाच..पण जन्म आणि मृत्यू कुणाच्या हातात नसतो. सत्य हे स्विकरण्याशिवाय पर्याय नसतो हे खरे असल्याने ते स्वीकारणे गरजेचेच आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

Ajit Pawar
महाबळेश्वर तालुक्याचे नेते बाळासाहेब भिलारे यांचे 72 व्या वर्षी निधन

Don’t make govt shut everything if 3rd Covid wave hits: Maha Dy CM Ajit Pawar

काम करताना दूरदृष्टी हा त्यांचा एक स्थायीभाव होता. त्यामुळे त्यांच्या कामाचा आवाका पाहून तरुण ही कधी कधी फिके पडत. महाबळेश्वर तालुक्यात बाळासाहेब भिलारे यांना जनता देव मानत होती. देवत्वाचे गुण असलेला हा नेता गेल्याने महाबळेश्वर तालुका खरोखर पोरका झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी