महाराष्ट्र

संजय मंडलिकांच्या निर्णयावर सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी

टीम लय भारी

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदारांच्या पाठोपाठ आता खासदारांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि धैर्यशील माने यांचा समावेश आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे फक्त त्यांच्याच पक्षातील नेते नाही तर इतर पक्षातील नेत्यांनी देखल नाराजी दर्शविली आहे.

संजय मंडलिक यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावर पहिल्यांदाच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. संजय मंडलिक यांच्या या निर्णयामुळे दुःख झाल्याचे आमदार सतेज पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. संजय मंडलिक हे दिल्लीला जात असताना त्यांना तुम्ही दिल्लीला जाऊ नका असे आमच्याकडून फक्त सांगण्यातच आले नव्हते तर विनंती सुद्धा करण्यात आली होती. पण त्यांनी तसे न करता दिल्लीची वाट धरली. त्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच दुःखद आहे. पण जिल्ह्याच्या राजकरणामध्ये, विकासामध्ये संजय मंडलिक सोबत राहतील, अशी भावना सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार यांचा वेगळा गट तयार करून काय मिळणार आहे? या राजकीय घटनेमागील खरी कारणं येत्या दोन महिन्यात बाहेर तर येतीलच. पण देशामध्ये याआधी कधीही असे सुडाचे राजकारण झाले नव्हते असेही यावेळी सतेज पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात अद्यापही भाजप-शिंदे सरकारकडून मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. किमान सरकारने राज्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी नेमायला हवा, असेही सतेज पाटलांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले… यांना मजा मारायला निवडून दिले का? जळगावात तुफान डायलाॅगबाजी

निष्ठा यात्रेनंतर शिवसेनेला भिवंडीत बसला धक्का

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नेते एकनाथ खडसे यांच्या हटके शुभेच्छा

पूनम खडताळे

Recent Posts

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

2 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

2 hours ago

महाराष्ट्रात मराठी माणसालाच No Welcome

जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…

3 hours ago

‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’: शांतीगिरी महाराज

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…

4 hours ago

ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…

4 hours ago

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…

4 hours ago