महाराष्ट्र

Shrirampur News : अदिवासी तरुणाचा खून, भाजपचे नेते उतरले रस्त्यावर

अहमदनगर जिल्हातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. आदिवासी समाजाच्या तरुणाने एका मुस्लिम मुलीशी प्रेमविवाह केला. मुलीच्या कुटुंबियांची या विवाहाला मान्यता नव्हती तरी सुद्धा दोघांनी पुढाकार घेत  लग्न केले परिणामी याच गोष्टीचा राग मनात ठेऊन काही समाजकंठक मुस्लिम तरुणांनी या आदिवासी तरुणाचा खून केला. या घटनेनंतर श्रीरामपूरममध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद सर्वच स्तरावरून उमटले आणि या दुर्देवी घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री आहे अशोक उईके (Ashok Uike) यांचा नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला, यावेळी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सुद्धा हजेरी लावली होती.

हाती आलेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावातील दीपक बर्डे या आदिवासी तरुणाचे एका मुस्लिम मुलीवर प्रेम जडले. त्यातून त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला मुलीच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता परंतु त्याला न जुमानता या प्रेमी युगुलांनी लग्न केले. या लग्नाला काहीच दिवस उलटणार तोच या तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस तपास सुरू झाला असून यावेळी मुलाचा खून करण्याच्या हेतूने अपहरण करून खून केल्याचा दाट संशय पोलिसांकडून आता व्यक्त करण्यात येत आहे.

या खून प्रकरणी पोलिसांनी मजनू शेख, इम्रान अब्बास अजीज शेख, राजू शेख, समीर शेख अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या पाचही जणांवर पोलिसांनी आरोपींवर अपहरण व ऍट्रोसिटी चे कलम लावले आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील वातावरण फारच गंभीर बनले आहेत. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून याप्रकरणी ते न्यायाची अपेक्षा करीत आहेत.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : ‘भाजपची लोकं डोक्यावर पडली आहेत’

Exclusive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचे चार बंगले बळकावले!

Uddhav Thackeray- Varkari Meeting : उद्धव ठाकरेंच्या भेटीला वारकरी मातोश्रीवर

आंतरजातीय विवाह केल्यामुळे राग मनात ठेऊन आदिवासी तरुणाच खून करण्यात आला. या घटनेचे पडसाद सर्वदूर पसरले त्यामुळे याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री आहे अशोक उईके यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून या दुर्दैवी घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवत सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे, शिवाय आदिवासी समाजाकडून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

दुर्देवी घटनेच्या निषेधार्ध काढलेल्या मोर्चाच्यावेळी अशोक उईके यांना माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, दीपक बर्डे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आमचा जीवाला धोका आहे ही तक्रार करण्यासाठी गेला असता संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पीआय माच्चींद्र खाडे यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. या संदर्भात देखील सखोल चौकशी झाली पाहिजे, शिवाय ही अतिशय गंभीर घटना असून यामुळे समाजात आणि अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे म्हणून त्यांनी या गंभीर घटनेकडे लक्ष वेधून घेत पोलिस यंत्रणेला फैलावर घेतले आहे.

पुढे अशोक उईके म्हणतात, आम्ही शासनाला विनंती करतो की पोलिसांनी दीपक बर्डे यांच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे. आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आदिवासी आणि दलीत समाजाचे मुस्लिम समाजाकडून होणारे अत्याचार तात्काळ थांबले पाहिजे या बाबत उपाय योजना कराव्यात तसेच गुन्ह्यातील आरोपीं विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाही करून संबंधित खटला जलदगती न्यायालयात चालवून आदिवासी, दलित समाजाला न्याय मिळवून द्यावा ही मागणी, असे म्हणून उईकेंनी तरुणाला न्याय लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

20 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

1 hour ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

5 hours ago