35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयExclusive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचे चार बंगले बळकावले!

Exclusive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचे चार बंगले बळकावले!

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेवून तीन महिने उलटले. शिंदे यांनी नव्याने वर्षा बंगल्याचा ताबा घेतला आहे. पण जुने बंगले सोडलेले नाहीत.तापर्यंतच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांना चार बंगल्यांची गरज भासली नाही. मग एकनाथ शिंदे मात्र इतके बंगले कसेकाय वापरतात, असाही सवाल व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेवून तीन महिने उलटले. शिंदे यांनी नव्याने वर्षा बंगल्याचा ताबा घेतला आहे. पण जुने बंगले सोडलेले नाहीत. त्यामुळे एकूण चार सरकारी बंगले त्यांच्या ताब्यात आहेत. नंदनवन, अग्रदूत, तोरणा व वर्षा अशी या चार बंगल्यांची नावे आहेत. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने इतके बंगले एकाच वेळी स्वतःच्या ताब्यात ठेवलेले नाहीत. शिंदे यांनी मात्र नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे सूत्रांनी सांगितले. वर्षा व तोरणा हे दोन्ही बंगले जुळे आहेत. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती वर्षा बंगल्यावर राहते. मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी तोरणामध्ये राहतात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्यमंत्रीपदावर आलेल्या व्यक्तींनी वर्षा व तोरणा हे दोनच बंगले वापरलेले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी मात्र चार बंगले वापरून नवा विक्रम स्थापन केला आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. त्यावेळी त्यांना नंदनवन हा बंगला देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अग्रदूत हा बंगला बळकावला. नंदनवन बंगल्याच्या जवळच अग्रदूत हा बंगला आहे. त्यामुळे अग्रदूत बळकावल्याचे फार कुणाच्या लक्षात आले नाही. ठाकरे सरकारविरोधात शिंदे यांनी बंड केले, व ते मुख्यमंत्रीपदावर आले. या पदावर आल्यानंतर त्यांना वर्षा बंगला मिळाला.

हे सुद्धा वाचा…

Uddhav Thackeray- Varkari Meeting : उद्धव ठाकरेंच्या भेटीला वारकरी मातोश्रीवर

Indian Cricket Team : राहुल द्रविडचे मोठे वक्तव्य, भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर केले भाष्य

Maharashtra Politics : मनसेला मिळणार मंत्रीपद, अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आशा पल्लवित !

आतापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी वर्षासोबत तोरणा हा बंगला सुद्धा वापरासाठी घेतलेला आहे. त्यामुळे शिंदे यांनी सुद्धा वर्षा व तोरणा एकसाथ स्वतःकडे घेतले. त्यामुळे एकूण चार बंगले शिंदे यांच्या ताब्यात आहेत. नंदनवन व अग्रदूत बंगल्यावर एकनाथ शिंदे राहतात. बैठका मात्र वर्षावर घेतात. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात शिंदे यांनी वर्षावरच गणेशमूर्तीची स्थापना केली होती.

सध्या वर्षा बंगल्यावर दुरूस्तीचे काम सुद्धा जोरात चालू आहे. खरेतर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बंगल्याची दुरूस्ती व नुतनीकरण झाले होते. त्या नुतनीकरणाची चकाकी व लखाखी अद्याप ताजी आहे. असे असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा नव्याने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी कमीतकमी एक कोटी रुपये तरी खर्च होतील, असा अंदाज आहे.

वास्तुशास्त्रानुसार शिंदे यांना बंगल्यात काही बदल करायचे आहेत. त्यामुळे ही दुरूस्ती हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तवात, महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी आहे. राज्यातील जनता आर्थिक टंचाई व महागाईच्या झळा सोसत आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी केवळ अंधश्रद्धेच्या आहारी जावून नव्या कोऱ्या बंगल्याचे पुन्हा नुतनीकरण करण्यासाठी खर्च करावा का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे कमी म्हणून की काय शिंदे यांनी नंदनवन व अग्रदूत हे आणखी दोन बंगले ताब्यात ठेवले आहेत. आतापर्यंतच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांना चार बंगल्यांची गरज भासली नाही. मग एकनाथ शिंदे मात्र इतके बंगले कसेकाय वापरतात, असाही सवाल व्यक्त होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी