35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईUddhav Thackeray- Varkari Meeting : उद्धव ठाकरेंच्या भेटीला वारकरी मातोश्रीवर

Uddhav Thackeray- Varkari Meeting : उद्धव ठाकरेंच्या भेटीला वारकरी मातोश्रीवर

उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर वारकरी समाजाच्या लोकांनी त्यांना आळंदी येथे त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा असलेले रूग्णालय आणि आषाढी व‍ कार्तिकी वारीदरम्यान त्यांना विश्रांतीसाठी, भोजनासाठी आणि राहण्यासाठी उत्तम सुविधा असलेले वारकरी भवन उभारण्यात यावे या गोष्टींची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा विरोधी पक्षाचे प्रमुख नेते या नात्याने त्यांच्या रास्त मागणीची दखल घेतली.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या (Varkari Community) सुमारे 100 पेक्षा जास्त अनूयायांनी आज पूर्व मुख्यमंत्री (Chief Minister) आणि शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या वांद्रे येथील मातोश्री (Matoshree) या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी वारकरी पंथाच्या अनुयायांशी त्यांच्या राहत्या घरी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली आणि त्यांचा पाहुणचार केला. उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेण्यापूर्वी वारकरी समाजाच्या लोकांनी मातोश्री बाहेर जमून ‘जय हरी विठठल’ आणि ‘छत्रपति शिवाजी महाराज की जय’ या घोषणांचा गजर केला. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. वारीला महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.

‘पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे.

उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर वारकरी समाजाच्या लोकांनी त्यांना आळंदी येथे त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा असलेले रूग्णालय आणि आषाढी व‍ कार्तिकी वारीदरम्यान त्यांना विश्रांतीसाठी, भोजनासाठी आणि राहण्यासाठी उत्तम सुविधा असलेले वारकरी भवन उभारण्यात यावे या गोष्टींची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा विरोधी पक्षाचे प्रमुख नेते या नात्याने त्यांच्या रास्त मागणीची दखल घेतली. नुकतेच राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपप्रणित नवीन सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे आणि वारकरी समाजाच्या अनुयायांच्या भेटीमध्ये त्यांनी आपण या मागणीचा शासन दरबारी पूरेपूर्ण पाठपुरावा करु असे आश्वासन दिले.

हे सुद्धा वाचा –

Indian Cricket Team : राहुल द्रविडचे मोठे वक्तव्य, भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर केले भाष्य

Maharashtra Politics : मनसेला मिळणार मंत्रीपद, अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आशा पल्लवित !

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अतिरेकी याकूब मेमनच्या नातलगाबरोबर सलगी

मागच्या वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंसह आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापूर जिल्हयातील पंढरपूर येथे विठठल‍ आणि रूक्मीणी या देवतांची पूजा अर्चना केली. कोरोना रोगाच्या साथीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी विठठलापुढे साकडे घालून महाराष्ट्राच्या जनतेच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली होती.

त्यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेला 5 कोटी रूपयांचा धनादेश दिला होता.

वारकरी संप्रदाय हा पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणून ओळखला जातो. आषाढी वारीमध्ये मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारीचा सोहळा हा एक संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला होता.

 

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी