31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईMaharashtra Politics : ‘भाजपची लोकं डोक्यावर पडली आहेत’

Maharashtra Politics : ‘भाजपची लोकं डोक्यावर पडली आहेत’

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर तोडंसुख घेतले आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासोबत याकूब मेमनचा चुलतभाऊ रौफ मेमन असल्याचे दिसत आहे. त्यावर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपची लोकं डोक्यावर पडली आहेत. त्यांचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नाही, असे संतप्त उद्गगार मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काढले आहेत. किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडीओ भाजपच्या नेत्यांनी व्हायरल केला आहे. किशोरी पेडणेकर महापौर पदावर असताना त्यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फाशी दिलेला गुन्हेगार याकूब मेमन याचा नातलग सहभागी झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर तोडंसुख घेतले आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासोबत याकूब मेमनचा चुलतभाऊ रौफ मेमन असल्याचे दिसत आहे. त्यावर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईभरातील कचरा, पाणी तुंबणे या समस्यांच्या अनुषंगाने यशवंत जाधव यांच्या तक्रारीवरून एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या वेळी अनेकजण उपस्थित होते. यशवंत जाधव यांनीच काही तक्रारदारांना आणले होते. या बैठकीत आलेल्या लोकांची नावे मला माहीत नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्ती याकूब मेमनची नातलग आहे, हे सुद्धा मला ठाऊक नव्हते. भाजपची लोकं डोक्यावर पडलेली आहेत. त्यांचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नाही, असा संताप किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

पेडणेकर यांनी हा संताप व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे एक छायाचित्र व्हायरल केले आहे. या छायाचित्रात रौफ मेमन हे फडणवीस यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. फडणवीस यांनी सुद्धा हे पुष्पगुच्छ हास्युमुद्रेने स्विकारल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा…

Exclusive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचे चार बंगले बळकावले!

Uddhav Thackeray- Varkari Meeting : उद्धव ठाकरेंच्या भेटीला वारकरी मातोश्रीवर

Indian Cricket Team : राहुल द्रविडचे मोठे वक्तव्य, भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर केले भाष्य

फडणवीस यांच्यासोबतचे मेमणचे छायाचित्र विधानभवनातील !

शिवसेनेने व्हायरल केलेले रौफ मेमन आणि देवेंद्र फडणवीस यांचे हे छायाचित्र विधानभवनातील आहे. विधानभवनातील लिफ्ट त्या ठिकाणी दिसत आहे. अनेकजण भेटायला येत असतात. त्यात ही कुणीतरी व्यक्ती होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

याकूब मेमनवरून राजकीय वादंग !

मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याचे भूत पुन्हा एकदा जागे झाले आहे. याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप झडू लागले आहेत.

बॉम्बस्फोटातील सहभागावरून याकूब मेमन याला सन 2015 मध्ये नागपूर येथील कारागृहात फाशी दिली होती. त्याचा मृतदेह मुंबईत आणून त्याच्या नातेवाईकांनी दफन केला होता. आता या कबरीची सजावट केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केला. त्यानंतर आशिष शेलार व किरीट सोमय्या यांनीही हा आरोप केला. शिवसेना सत्तेत असताना कबरीची सजावट झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.

त्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने पलटवार केला. याकूब मेमन हा अतिरेकी होता. त्याला फाशी दिल्यानंतर तो मृतदेह भाजप सरकारने नातलगांच्या ताब्यात का दिला, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. नथूराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी आहे. नथूराम गोडसेची अनेक हिंदुत्ववादी विचाराचे लोक पुजा करतात. गांधींजींच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी त्याची आठवण काढतात. गांधीजींचा पुतळा तयार करून त्यावर गोळ्या झाडल्याचा देखावा तयार करतात, असा आरोप विनय काटे या कार्यकर्त्याने केला होता. याकूब मेमणच्या मुद्द्यावर आता राजकारण पेटल्याचे दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी