महाराष्ट्र

Thane News : महाराजांच्या सिनेमावरून ठाकरे-पवार रणांगणात

चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतात. काही चित्रपट मैत्रीवर, काही प्रेम, काही सण, तर काही चित्रपट इतिहासाशी संबंधित माहिती देणारे असतात. गेल्या काही वर्षांत इतिहासाशी निगडित असे अनेक चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत, ज्यावरून बराच गदारोळ झालेला पाहायला मिळालेला आहे. पद्मावत, पीके, लक्ष्मी, ओह माय गॉड… हे असे काही चित्रपट आहेत जे चित्रपटगृहामध्ये रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडले होते. आता आणखी एका चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या शोवेळी गोंधळ झाला. सोमवारी (ता. 7 नोव्हेंबर) रात्रीच्या शो दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद केला. चित्रपटात छत्रपती शिवरायांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत हा सर्व गोंधळ झाला.

‘हर हर महादेव’ या चित्रपटात काही चुकीची दृश्ये दाखविल्याचा आरोप करत सोमवारी रात्रीच्या शो दरम्यान जितेंद्र आव्हाड हे आपल्या समर्थकांसह विवियाना मॉलमध्ये पोहोचले आणि तेथे सुरु असलेला चित्रपट थांबवला. दरम्यान, जेव्हा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या समर्थकांडून हा चित्रपट थांबविण्यात येत होता तेव्हा काही दर्शकांनी याला विरोध केला. परंतु यातील एका दर्शकाला आव्हाडांच्या समर्थकांनी मारहाण केली.

या संपूर्ण प्रकरणावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘हर हर महादेव’ चित्रपटात अशा अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, ज्या घडल्याच नाहीत. इतिहासात न घडलेल्या गोष्टी चित्रपटात दाखवणे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले पाहिजे. त्यामुळेच त्यांनी त्याठिकाणी जाऊन या चित्रपटाचा शो बंद केला.

दरम्यान, चित्रपटगृहात घडलेल्या या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात धाव घेत हा बंद शो पुन्हा सुरु केला. ज्यामुळे आता या चित्रपटाला राजकीय रंग मिळाला आहे. तर अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान सुद्धा केले, त्यानुसार आज मंगळवारी (ता. 8 नोव्हेंबर) जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर असलेल्या विवियाना मॉलमध्ये मनसेकडून ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा फ्री शो सायंकाळी 6.15 वाजता ठेवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : राज्य महिला आयोगाची एन्ट्री, अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा!

Andheri East Bypoll Election : विजय ऋतुजा लटकेंचा मात्र चर्चा नोटाला मिळालेल्या मतांची

Mumbai News : वरळीत पोटनिवडणूकची हिंमत दाखवा!; आशिष शेलार यांचे ठाकरेंना आव्हान

याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा सम्राटांबद्दल चुकीच्या गोष्टी प्रसारित केली तर खपवून घेतले जाणार नाही, अशी घोषणा केली होती. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी चित्रपटालाही त्यांनी आपला विरोध व्यक्त केला, ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आव्हाडांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी सोमवारी रात्री केलेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

5 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

5 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

6 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

6 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

6 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

10 hours ago