महाराष्ट्र

Uddhav Thakeray : ‘मध्यवर्ती निवडणूकांसाठी तयार रहा!’ उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण हादरलं

राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. महाराष्ट्रात केव्हाही मध्यावर्ती निवडणुका होऊ शकतात. असं भाकित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तवले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधानसभा संपर्कप्रमुखांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मध्यावर्ती निवडणुकीची तयारी सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत. शनिवारी (5 नोव्हेंबर) त्यांनी आपल्या पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. उद्धव ठाकरे यांनी असे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर यांनीदेखील यावर प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात मध्यावर्ती निवडणुकांना वाव नाही. सरकार बहुमतात आहे. राज्यात शांतता व सुव्यवस्था कायम आहे. मध्यावर्ती निवडणुकांचे भाकीत करणारे उद्धव ठाकरे ज्योतिषी आहेत का? शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बाहेर जाणे थांबवायचे असल्याने ते बोलत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ते असे बोलत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या गोटातील बहुतांश लोक आमच्यासोबत येण्यास तयार आहेत.

हे सुद्धा वाचा

Mumbai Mantralaya : मंत्रालय आहे की, टुरिंग टॉकीज?

Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

Virat Kohli Birthday Special : फॉर्म इज टेम्पररी, ‘विराट’ इज पर्मनंट

‘ठाकरेंनी आत्मपरिक्षण करण्याची गरज’
त्यावर पत्रकारांनी खासदार गजानन कीर्तिकर यांचे नाव घेत, ते अध्यक्ष असतानाही शिवसेनेच्या लोकाधिकार समितीच्या महासंग्राम कार्यालयाच्या उद्घाटनालाही हजर न राहिल्याने त्यांच्याबद्दल बोलत आहेत का, असा सवाल केला. त्यावर दीपक केसरकर म्हणाले की, मला कोणाचेही नाव वाढवायचे नाही. पण तरीही उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं असं नक्कीच म्हणावंसं वाटतं की बहुसंख्य जनता आपल्यासोबत आहे. बहुमत आमच्यासोबत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचेही केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी मध्यावर्ती निवडणुकांचे संकेत देण्यामागचे कारण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटी रुपयांचे 225 प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर हे घडते. असा युक्तिवाद करत उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानसभा संपर्क प्रमुखांना निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, सध्यातरी महाराष्ट्रात सरकार पूर्णपणे स्थिर आहे आणि कोणत्याही प्रकारे मध्यवर्ती निवडणूका लागण्याची चिनेह दिसत नसल्याचे प्रत्यारोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

4 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

5 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

5 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

5 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

5 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

9 hours ago