24 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरराजकीयMaharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात 'तू-तू.. मैं-मैं'

Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसमधील एक-दोन नाही तर तब्बल 22 आमदार फोडणार असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये कधी कोणता आमदार कोणाच्या पक्षात प्रवेश करेल हे सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमधील 40 आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या 10 अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी (Rebel MLA) केली. या राजकारणातील धक्कादायक घडामोडीनंतर काँग्रेस (Congress) आणि त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा सुरु झाली. परंतु आता ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसमधील एक-दोन नाही तर तब्बल 22 आमदार फोडणार असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे. भाजप-शिंदे सरकारचे राज्यात असलेले सरकार पडणार असल्याने भाजपकडून ही तयारी करण्यात आल्याचे सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मूळच्या शिवसेनेत असलेल्या आमदारांना फोडण्यात आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर यांतील १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी अद्यापही झालेली नाही. राज्यात हे सर्व सुरु असतानाच चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे.

औरंगाबाद येथे शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘निवडणुकीत मुस्लिम समाजाचे बोनस मते शिवसेनेला मिळतात. मुस्लिमांचे 20 टक्के मते शिवसेनेला मिळणार असून, ते आपले बोनस मत आहे. तर लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतील आणि हे सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत .’ चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या या विधानामुळे मात्र काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. त्यामुळे आता खरंच काँग्रेसमधील आमदार फुटणार का ? अशा चर्चा रंगून लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

First Indian Voter Death : भारताच्या पहिल्या मतदाराचे झाले निधन

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रुग्णालयात शरद पवारांना भेटले; वाचा काय झाली चर्चा

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना ‘टीकली’वरील वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस!

चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी खैरेंवर पलटवार करत त्यांना उत्तर दिले आहे. ‘ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, ‘ असा सल्ला नाना पटोले यांच्याकडून चंद्रकांत खैरे यांना देण्यात आला आहे. तर खैरेंचे हे वक्तव्य कितपत खरं ठरेल हे माहित नाही परंतु त्यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीमध्ये मात्र नवा वाद सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, याआधी देखील काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या आणि भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. यामध्ये अशोक चव्हाण, असलम शेख आणि वर्षा गायकवाड या आमदारांची नावे घेतली जात होती. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. पण आता पुन्हा एकदा आमदार फुटीच्या विषयाला खतपाणी मिळाल्याने या चर्चांना सुरुवात झाली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!