31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमतदारांचा कौल कोणाला काँग्रेसच्या वर्षा गायकवाड की भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम

मतदारांचा कौल कोणाला काँग्रेसच्या वर्षा गायकवाड की भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम

अॅड. उज्ज्वल निकम म्हणजे बऱ्याचदा कुठल्या ना कुठल्या केसच्या निमित्ताने नेहमीच बातमीपत्रात दिसणारा चेहरा. त्यांनी गेली ३ दशके विविध महत्वाच्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे आणि या खटल्यांमुळेच त्यांची विशेष सरकारी वकील अशी ओळखही निर्माण झाली आहे. जळगाव येथील एका उच्चशिक्षित कुटुंबातून आलेल्या निकम यांनी अंबरनाथ येथील १९९१ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते.

अॅड. उज्ज्वल निकम म्हणजे बऱ्याचदा कुठल्या ना कुठल्या केसच्या निमित्ताने नेहमीच बातमीपत्रात दिसणारा चेहरा. त्यांनी गेली ३ दशके विविध महत्वाच्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे (Varsha Gaikwad of Congress vs Ujjwal Nikam of BJP)आणि या खटल्यांमुळेच त्यांची विशेष सरकारी वकील अशी ओळखही निर्माण झाली आहे. जळगाव येथील एका उच्चशिक्षित कुटुंबातून आलेल्या निकम यांनी अंबरनाथ येथील १९९१ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. तो त्यांच्या कारकिर्दीतील पहिला महत्वाचा खटला होता. त्यानंतर मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटशी संबंधित खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. आणि त्यांच्या कारकिर्दीला कलाटनी मिळाली. त्यानंतर, अनेक महत्वाच्या खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली गेली. गुलशन कुमार हत्या प्रकरण, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित बाल हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २००८ सालचा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संंबंधित खटला.त्याचबरोबर शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या या प्रकरणांचा देखील समावेश आहे. निकम यांना २०१६ साली पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात देखील आले आहे.
भाजपच्या उमेदवारीमुळे अॅड. उज्ज्वल निकम हे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी