विदर्भ

Winter Session : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल घडत आहेत. राज्याच्या राजकारणाचा तिढा सुटता सुटत नाही. राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेटशिवाय इतर मंत्री नाहीत. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. राज्यात अजुन पालकमंत्री नाही. मात्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहिर झाली आहे. ‍19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अध‍िवेशन (winter session) सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरू झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था कशी असेल याचा आढावा विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी घेतला. हिवाळी अधिवेशनाचा अहवाल येत्या 15 दिवसांत सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेश झाले नव्हते. नागपूरच्या विधान भवनातील सर्व सोयीसुवीधा तपासून घेण्याचे आदेश राहूल नार्वेकर यांनी दिले. इंटरनेटचा स्पीड, अध्यक्षांचे दालन, आमदार निवासात नूतनीकरण करण्याच्या सूचना देखील राहूल नार्वेकर यांनी दिल्या. सभागृहातील सर्व व्यवस्था तपासून घेण्याच्या सूचना दिल्या. सगळी दालने तपासून आवश्यक ते बदल, दुरूस्ती, डागडुजी तसेच वीजेचा पुरवठा, आसन व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, स्वच्छतागृहे इत्यादी सर्व तपासून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच 160 गाळयांमध्ये चालणारी पाणी तापविण्याची यंत्रणा ही पेट्रोल गिझरवर होती. ती बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता त्या ठिकाणी अद्ययावत यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या सर्व सोयी सुव‍िधांमध्ये बदल करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

Fat people : म्हणून माणसं होताहेत गलेलठ्ठ …….

Ratan Tata : ‘हे’ ॲप्स तयार करण्यात रतन टाटांचे मोठे योगदान

Nirmala Sitharaman : राष्ट्रवादीचा गड फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला स‍ितारमण बारामती दौऱ्यावर

राज्याचे दुसरे विधान भवन हे उपराजधानी नागपूर येथे आहे. सिव्हिल लाईन्स पर‍िसरात आहे. याच विधान भवनामध्ये राज्याचे दुसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. या इमारतीची ‍ पायाभरणी 1912 मध्ये करण्यात आली. ब्रिटीश कामांडर सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरारच्या प्रशासनासाठी ही इमारत तयार करण्यात आली हाेती.

पूर्वी नागपूर हे राजधानीचे शहर होते. 1960 नंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने नागपूर करार केला. त्यानंतर नागपूर उपराजधानी झाली. त्यावेळपासून राज्याचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे हिवाळी अध‍िवेशन नागपूरला आयोजित करण्यात येते.

रूपाली केळस्कर

Recent Posts

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं  तर त्या साठी…

21 mins ago

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

3 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

3 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

16 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

16 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

17 hours ago