31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रNirmala Sitharaman : राष्ट्रवादीचा गड फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला स‍ितारमण बारामती दौऱ्यावर

Nirmala Sitharaman : राष्ट्रवादीचा गड फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला स‍ितारमण बारामती दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) या आजपासून त‍िन द‍िवस बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या त्या बरामती मतदारसंघासह पुण्यातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) या आजपासून त‍ीन द‍िवस बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या त्या बरामती मतदारसंघासह पुण्यातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. केंद्र सरकारच्या विव‍िध योजनांचा बारामतीमध्ये कसा उपयोग करुन घेता येईल याची चाचपणी त्या यावेळी करणार आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय हेतूने नसल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. निर्मला स‍ितारमण यांच्या पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या भाषणाचीसुरूवात ही मराठी भाषेतून केली. तसेच भाजपने सिंबायोसिस महाविद्यालया ‘ व्यवस्था पर‍िवर्तनाची वीस वर्षे ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.

आजपासून तीन दिवस म्हणजेच 22, 23, 24 सप्टेंबरला निर्मला स‍ितारमण बारामती मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटीगाठी घेणार आहेत. देशातील 140 लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच योजनांची अंमलबजावणी कशी होते. कोणत्या अडचणी आहेत. त्या संदर्भात त्या आढावा घेणार आहेत. तसेच बारामतीमध्ये जी विकास कामे रखडली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी निधी देण्याचा केंद्रातून प्रयत्न त्या करणार आहेत. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्या हॉटेलमध्ये न राहता कार्यकर्त्यांच्या घरी राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Ratan Tata : ‘हे’ ॲप्स तयार करण्यात रतन टाटांचे मोठे योगदान

Tirupati Balaji : मुस्लिम जोडप्याचे तिरुपती बालाजीला कोटींचे दान

Aaditya Thackeray : शिंदे सरकार महाराष्ट्रातील रोजगार पळवतेय; आदित्य ठाकरेंचा आरोप

त्यांचे जेवण हे साधे शाकाहारी असते. काही दिवसांपासून निर्मला सितारामण यांच्या बारामती दौऱ्याच्या चर्चांना उधाण आले होते.तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आम्ही बारामती जिंकणारच असा वीडा उचलला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता निर्मला सितारमण यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच बरामतीच्या खासदार सुप्रीया सुळे तसेच शरद पवार‍, अजित पवार यांना शह देण्यासाठी भाजपने निर्मला ‍स‍ितारमण यांना पाठवले आहे.

राष्ट्रवादीचा बालेक‍िल्ला अशी बारामतीची ओळख आहे. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची मोहिम भाजपकडून आखण्यात येत असल्याच्या चर्चा देखील त्यांच्या भेटीमुळे उधाण आले आहे. या भेटीमध्ये सितारमण या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघटनात्मक आढावा घेणारा आहेत. काही नव्या घोषणा देखील करण्यची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी