27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यFat people : म्हणून माणसं होताहेत गलेलठ्ठ .......

Fat people : म्हणून माणसं होताहेत गलेलठ्ठ …….

माणसं दिवसेंदिवस गलेठ्ठ (Fat people) होत चालली आहेत. पूर्वी पैसे वाली माणसंच जाडी जुडी असायची आणि गरीब माणसं काटकूळी असायची. आता ते अंतर राहिलेले नाही. कारण सर्वांचे जीवनमान बदलत चालले आहे. आता तर रस्त्यावरचा भिकारी देखील आपल्याला जाडाजुडा पहायला मिळतो आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचे तर विचारुच नका.

बदलत्या जगात माणसे देखील बदल चालली आहेत. माणसांचे आकार ऊकार बदलत चालेले आहेत. ‍हा विषय तसा हलका फूलका वाटत असला तरी तो गांभ‍िर्यांने घेण्यासारखा नक्क‍ीच आहे. कारण आपण आपल्या अवती-भवती जाडी वाढलेली माणसे जास्त प्रमाणात पाहतो. हा नजरेचा फरक नसुन, हे एक सत्य आहे. माणसं दिवसेंदिवस गलेठ्ठ (Fat people) होत चालली आहेत. पूर्वी पैसे वाली माणसंच जाडी जुडी असायची आणि गरीब माणसं काटकूळी असायची. आता ते अंतर राहिलेले नाही. कारण सर्वांचे जीवनमान बदलत चालले आहे. आता तर रस्त्यावरचा भिकारी देखील आपल्याला जाडाजुडा पहायला मिळतो आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचे तर विचारुच नका. मोठया शहरांपेक्षा गावाकडील माणसं काही अंशानी बरी दिसतात.

हे वजन कमी करणे मोठे कर्म कठीण काम आहे. त्यामुळे ते वाढण्या आधीच काळजी घेतलेली बरी असते, असा सल्ला अनेक वेळा आपल्याला तज्ञ देतात. आजकाल आपल्या जीवनातील खेळ हरवत चालेले आहेत. लहान मुलं आणि युवावर्ग खेळतांना दिसत नाही. शाळेच्या मैदानात देखील चांगले खेळ शिकवले जात नाहीत. आपल्याला लहानमुलं तसेच युवक-युवती खेळतांना दिसतात. ते मोबाईलमधील गेम. लहान थोर सर्वजण आता मोबाईलला इतके कनेक्ट झाले आहेत. की, मोबाईलशिवाय जगणं अशक्य झाले आहे. मोबाईलच्या वेडापायी खेळाचा आनंद हरवत चालला आहे.

शरीराचा व्यायाम होईल असे मैदानी खेळ कोणी खेळतच नाही.‍ क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लगोरी, लंगडी धावरी, डबा ऐसपैस, सोन साखळी, आटयापाटया, फूटबॉल, हॉली बॉल, विटी दांडू, बास्केट बॉल, बॅटमेंटन, टेनीस कोणी खेळतांनाच दिसत नाही. गावाकडच्या गल्लीमध्या गोटया देखील दुर्मीळ झाल्या आहेत. आता कोणी वडाच्या पारांब्यांना लटकून झोके घेत नाही. विहीर, तलाव, नदीमध्ये उडया मारून पोहोतही नाही. सगळं जीवन कसं एकदम तकदालू झालयं. हे सगळे खेळ नकळतपणे शरीराची हालचाल झाल्याने माणसाला फीट ठेवत होते. त्याच्यासाठी जिममध्ये यायची गरज नव्हती. भरपूर खेळाचे आणि मस्त पोटभर जेवायचे मग आरोग्य देखील उत्तम राहते. आता खेळायचे नाही, न‍ीट जेवायचेही नाही असे सुरू आहे. सगळे जण जंक फूड, रस्त्यावर मिळणारे तळलेले पदार्थ तसेच चायनीजच्या गाडयावर तुटून पडतात. शिवाय अलिकडे मांसाचे तुकडे तळलेले मिळतात. त्यावर देखील संध्याकाळी लोक तुटून पडतात.

प‍िझा, बर्गर, मॅगी, पास्ता, पनीर आणि बरेच काही परदेशी पदार्थ जिभेवर रेंगाळायला लागले की, घराचे वरण भात, भाजी चपाती, भाकरी, पोहे, उपमा नकोसा वाटतो. या देशी आणि परदेशी दोन्ही प्रकारच्या असंख्य पदार्थांमध्ये मोठया प्रमाणात बटर म्हणजे लोणी असते. प्रथीने असतात. हे सर्व पदार्थ पचायला जड असतात.‍ शिवाय ऑफीसमध्ये 8 ते 10 तास बसयाचे, प्रवास गाडीतून करायचा, दिवसातले 8 ते 9 तास वगळता सतत मोबाईलवर राहायचे. टीव्ही पहायचा. शाळेत 6 ते 7 तास बसायचे. चटपटीत खायचे.

फळे खायची नाही तर फळांचे बाटलीमधील जूस आणि शेक प्यायचे, आईक्रीम खायचे मग का वजन वाढणार नाही. कधीतरी संध्याकाही गरम गरम चणे शेंगदाणे खा. आरोग्याला देखील उत्तम आणि तोंडाचा स्वाद देखील वाढवतात. मोबाईलवर माहितीचा खजिना जरी असला तरी माणसांनी अवतीभोवती पाहणे देखील जरुरीचे आहे. आपल्याला पूर्वीचे कपडे फीट होऊ लागले. तर थोडे स्वत:कडे लक्ष दयायाला हवे. जाडी कमी करण्यासाठी खूप पैसे भरून जीमध्ये जाण्यापेक्षा 1 तास चालेले तरी खूप झाले. अगदी रामदेव बाबांनी सांगितलेली सगळी योगासने करणे शक्य नाही परंतु किमान 10- 12 सूर्यनमस्कार‍ आणि 20- 25 दंड बैठका मारायला काय हरकत आहे. परंतु हे शक्य नाही. सगळे ऑनलाईन हवे. आपल्या शरीराची हालचाल करायला नको. मग गलेलठृ होणार नाहीतर काय होणार.

हे सुद्धा वाचा

तोंडाला थोडं बंधन घातलं तरी सगळं ठ‍िक होईल. पालेभाज्या आणि फळं भरपूर प्रमाणात खायला हवी. आपल्या सणांना बनवता ते पदार्थ त्या त्या सणांना बनवून खायला हवे. ते सगळे पदार्थ अगदी नियोजन बद्ध पद्धीतीने त्या त्या सणांसाठी नेमून दिले आहेत. हे आवडत नाही ते आवडत नाही. तुम्ही लॉलीपॉप ज्या आवडीने खाता तितच्या आवडीने मेथीचा लाडू आणि डिंकाचे लाडू खाल्याने शरीरात शक्ती वाढते. दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करण्यापेक्षा आपले हित कशात आहेत याचा क्षणभर का होईना विचार करायला हवाच, तर आरोग्य उत्तम राहू शकते.

आजारी माणसांचे सोडा. परंतु ज्यांना आजार नाही त्यांनी दररोज घरी व्यायाम करायला काय हरत आहे. तिशीच्या अातच  शुगर, रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. एक जिना चढतांना धाप लागले. हे उत्तम आरोग्याचे लक्षण नाही. हे देखील अनेक जण समजून न समजल्या सारखे करतात.

दुसरे असे की, घरतील सगळी कामे करण्यासाठी नोकर चाकर ठेवण्यापेक्षा काही गोष्टी स्वत: देखील करायला हव्या. कधीतरी कपडे वॉशिंग‍ मश‍िनमध्ये न टाकता हाताने धुवा. कधी तरी चटणी मिक्समध्ये न वाटता पाटयावर वाटा किती सुंदर चव अनुभवता येते. गावापासून शहरांपर्यंत आता सगळेच बदलेले आहे. प्रत्येक माणूस आत्म मग्न होत चालला आहे. त्याचे सारे विश्व मोबाईलने व्यापून टाकले आहे. त्यामुळे आता या जगात धडधाकट, धट्टया-कट्टया माणसांचा टक्का घसरत चाललाय हे मात्र चिंताजनक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी