मंत्रालय

Breaking : उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यात कोण आले, कोण गेले

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. सुमारे २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ( Mahavikas Aghadi government declared transfers of officers ).

उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या आहेत. इतर संवर्गातील याद्याही यथावकाश जाहीर होतील असे सूत्रांनी सांगितले.

तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ही पहिली यादी महसूल विभागाने जाहीर केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाली नाहीत, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतरची यादी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

औरंगाबाद विभाग (कंसात सध्याचे ठिकाण व कंसाच्या बाहेर नवीन ठिकाण)

संदिपान सानप ( उपविभागीय अधिकारी वैजारपूर ) – उपविभागीय अधिकारी जालना

दिलीप कच्छवे ( प्रतिक्षेत ) – उप जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली

सचिन गिरी ( प्रतिक्षेत ) – उप जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

राजेंद्र खंदारे ( निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद ) – उप विभागीय अधिकारी, भोकर, नांदेड

अमरावती विभाग

सुनिल विंचनकर ( उप जिल्हाधिकारी, मलकापूर, बुलढाणा ) – उप जिल्हाधिकारी, वाशिम

मुकेश चव्हाण ( उप विभागीय अधिकारी, खामगाव, बुलढाणा ) – उप जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला

गौरी सावंत (उप जिल्हा निवडणूक अधिकारी, बुलढाणा ) – जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

नाशिक विभाग

शाहूराव संभाजी मोरे (विशेष भूसंपादन अधिकारी, नगर ) – उप जिल्हाधिकारी, नंदूरबार

सुधीर खांदे ( उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नंदूरबार ) – निवासी उपजिल्हाधिकारी, नंदूरबार

पल्लवी निर्मळ ( उपजिल्हाधिकारी, नाशिक ) – जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अहमदनगर

नितीन मुंडावरे ( प्रतिक्षेत ) – उप जिल्हाधिकारी, नाशिक

नागपूर विभाग

मनोहर गव्हाड ( उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर ) – निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर

गंगाराम तळपाडे (उप विभागीय अधिकारी, तिरोडा, गोंदिया ) – निवासी उपजिल्हाधिकारी, गडचिरोली

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दणका, IAS मिलिंद म्हैसकर यांची केली उचलबांगडी

माणच्या निष्काळजी प्रांताधिकारी, तहसिलदारांची उचलबांगडी होणार

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

Breaking : पोलिसांच्या बदल्यांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

उद्धव ठाकरेंनी केल्या आणखी IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

बाळासाहेब थोरात सोलापूरसाठी उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकणार

कोकण विभाग

सुषमा सातपुते ( उप जिल्हाधिकारी, भूसंपादन, मुंबई शहर ) – उप जिल्हाधिकारी, रायगड

विठ्ठल इनामदार ( उप विभागीय अधिकारी महाड ) – उप विभागीय अधिकारी, पेण

प्रतिमा पुदलवाड (उप विभागीय अधिकारी, पेण ) – उप विभागीय अधिकारी, महाड

पांडूरंग मगदूम ( उप जिल्हाधिकारी, डहाणू,पालघर ) – मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई

निशाताई कांबळे ( उपजिल्हाधिकारी, सिंधुर्दुर्ग ) – उप जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन

पुणे विभाग

कीर्ती नलावडे ( उप विभागीय अधिकारी, कोरेगाव ) – जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सातारा

ज्योती पाटील ( उप विभागीय अधिकारी, सोलापूर ) – उप विभागीय अधिकारी, कोरेगाव, सातारा

संपत खिलारी ( उप विभागीय अधिकारी, भुदरगड ) – अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर

सिमा होळकर ( प्रतिक्षेत ) – उप जिल्हाधिकारी (महसूल), पुणे विभागीय कार्यालय

तुषार खरात

Recent Posts

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

2 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

2 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

2 hours ago

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

3 hours ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

3 hours ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

3 hours ago