मंत्रालय

Exclusive: दांडग्या मलईदार पदावर ‘विद्वान’ अधिकाऱ्याची नियुक्ती!

महाराष्ट्रातील मलईदार पदांची यादी तयार केली तर मुंबईतील एक असे पद आहे की, त्याचा टॉप टेन पदांमध्ये समावेश होत असेल. हे पद अतिशय महत्वाचे आहे, पण तितकेच बदनाम सुद्धा आहे. या पदावर येण्यासाठी अधिकारी वाट्टेल ती ‘किंमत’ मोजायला तयार असतात. खोक्यांचे मजबूत टेंडर भरणारे अनेक अधिकारी रांग लावून या पदावर यायला तयार असतात. छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या पदाचे महत्व, वजन व किंमत वाढवून ठेवली. सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) हे पद आहे. कार्यकारी अभियंता (इलाखा शहर) असे या पदाचे नाव आहे. या पदावर विद्याधर पाटसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे (Vidyadhar-pataskar appointed in Pwd Presidency Division).

विद्याधर पाटसकर यांनी मुंबई आयआयटीतून पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. यापूर्वी ते ‘मुंबई महानगर विकास प्राधिकरणा’मध्ये (एमएमआरडीए) कार्यरत होते. त्यामुळे मोठे प्रकल्प उभारण्याचा पाटसकर यांना अनुभव आहे. सोबत आयआयटीचीही शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची इलाखा शहरच्या कार्यकारी अभियंता पदावर झालेली नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

PWD : पीडब्ल्यूडीतील बदली घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण, PWD मंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता !

IAS : अपर मुख्य सचिव भर कौतुक सोहळ्यात अधिकाऱ्यांना म्हणाले, थोडी लाज ठेवा; निर्लज्ज होवू नका

रवींद्र चव्हाण म्हणाले, PWD मध्ये बदल्यांसाठी पैसे घेतले जातात

खरेतर, एमएमआरडीएसारख्या चांगल्या यंत्रणेत कार्यरत असताना इलाखा शहरसारख्या मलईदार व बदनाम पदावर ते आलेच का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

इलाखा शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यकक्षेत मंत्रालय, विधिमंडळ, मंत्र्यांचे सगळे बंगले, राजभवन, दक्षिण मुंबईतील न्यायालये अशा महत्वाच्या इमारती आहेत. मंत्री, आयएएस अधिकारी, न्यायाधिश यांच्या दालनांची व निवासस्थानांची दुरूस्ती करणे, नुतनीकरण करणे अशी कामे इलाखा शहर विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यकक्षेत येत असतात.

व्हिआयपी मंडळींच्या घरांची व दालनांची कामे असल्याने सरकार वाट्टेल तेवढ्या खर्चाची उधळपट्टी करीत असते. बऱ्याचदा टेंडर न काढता, मंजुरी न घेताही दामटवून कामे केली जातात. त्यामुळे दोनशे रूपयाच्या कामावर दोन हजार रूपये खर्च दाखवून निधी ओरपायचा अशी कार्यपद्धत या ठिकाणी रूढ झालेली आहे.

कागदावर काम झाल्याचे दाखवायचे, आणि प्रत्यक्षात काम करायचेच नाही. पण त्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी चुटकीसरशी हडपायचा. मंत्री, आयएएस अधिकारी व न्यायाधीश यांचीच कामे करायची असल्यामुळे कारवाई व्हायची सुद्धा शक्यता नसते.

कार्यकारी अभियंता व त्यांची टीम मंत्री, आयएएस अधिकारी व न्यायाधीश यांनाही चुना लावतात. आपल्या दालनात व निवासस्थानी चुना लावल्याचे या मातब्बर मंडळींनाही ठावून नसते.

अशा या पदावर विद्याधर पाटसकर यांनी वर्णी लावून घेतली आहे. त्यामुळे पूर्वांपार चालत आलेले प्रकार ते पुढे असेच चालू ठेवणार का याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागलेले असेल.

पाटसकर यांच्या दांडपट्ट्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची पाचावर धारण !

दरम्यान, पाटसकर यांनी अधिकारपदाची सूत्रे हाती घेताच आपल्या कार्यकक्षेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना फैलावर घ्यायला सुरूवात केली आहे. सर्वांनी वेळेवर कामावर यायचे, आणि वेळे संपल्यानंतर निमूटपणे घर गाठायची तंबीच त्यांनी दिली आहे.

बोगस कामे बिल्कूल करायची नाही, कामात कुचराई केली तर निलंबित केले जाईल, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे उशिरा कामावर येणाऱ्या व घोटाळे करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या पदावर येणाऱ्यासाठी पाटसकर यांनी १ रूपयाही खर्च केला नसल्याची चर्चा आहे. या पदाच्या माध्यमातून पूर्वांपार चालत आलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठीच मंत्रालयातून त्यांची नियुक्ती केली असल्याचे बोलले जात आहे.

तुषार खरात

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago