‘उद्धव साहब हम आपके साथ है’ चिमुकलीने दिला धीर

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरूद्ध बंड पुकारल्याने अनेक आमदारांसह खासदार सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत, तर शिवसेना नगरसेवक सुद्धा त्याच ओळीत थांबल्याचे दिसत आहे. परंतु, अनेक निष्ठवंत शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबतच खंबीरपणे उभे आहेत. केवळ मोठी माणसे नाहीत तर लहानगी मुलं सुद्धा ‘उद्धव साहेब हिंमत हारू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, अशा काळजीच्या स्वरात धीर देत आहेत.

हरिश व्यास या शिवसैनिकाने आपल्या लहानग्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. यामध्ये हरिश लिहितात, माझी मुलगी मला रोज विचारते की @officeUT (उद्धव ठाकरे) साहेबांनी तिच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला का? असे म्हणून त्यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे.

हरिश व्यास यांनी त्यांच्या लहानग्या मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ही चिमुरडी बाबासोबत कारमधून प्रवास करताना दिसत आहे. त्यावेळी चालत्या गाडीतच उभं राहत तिने उद्धव ठाकरे यांना सद्यपरिस्थितीवर भाष्य करत काळजीने धीर दिला आहे.

व्हिडिओत ती मुलगी म्हणते, “उद्धवसाहेब…सगळेच तुम्हाला सोडून गेले, पण हिंमत हारू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत”, असे म्हणून तिने उद्धव ठाकरेंसाठी आपले समर्थन दर्शवले आहे.

हे सुद्धा वाचा…

खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दडपण्याचे षडयंत्र? मागास वर्गीय मुलांची मदतीसाठी हाक

शिंदे गटातील आमदाराच्या गाडीला अपघात

VIDEO : आमदार शहाजी पाटील यांनी दाखवला निर्लज्जपणा !

 

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

31 mins ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

2 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

3 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

3 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

3 hours ago

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…

4 hours ago