38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईशिंदे गटातील आमदाराच्या गाडीला अपघात

शिंदे गटातील आमदाराच्या गाडीला अपघात

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रतोद आणि महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गाडीला सकाळी मुंबईमध्ये अपघात झाला. मुंबईतील वाडी बंदरजवळील फ्री वेवर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात फ्री वेवर एकामागोमाग एक अशा आठ गाड्या एकमेकांना आदळल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेतील शिंदे गटातील विधी मंडळाचे प्रतोद भरतशेठ गोगावले हे सकाळी फ्री वे मार्गाने मंत्रालयात येत असताना हा अपघात घडला. या अपघातात आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या असून सुदैवाने कोणालाही कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांच्याकडून देण्यात आली आहे.

फ्री वेवरून मंत्रालयाच्या दिशेने जात असताना एका गाडीने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. ‘कोणीही काळजी करू नका. आम्ही सुखरूप आहोत’ असेही भरतशेठ गोगावले यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून तात्काळ सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली होती. पण शिंदे गटाने हे चुकीचे असल्याचे म्हणत शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती केली होती.

हे सुध्दा वाचा:

OBC आरक्षणावर आज न्यायालयात निकाल, पण त्या अगोदरच धनंजय मुंडेंनी दिले २७ टक्के आरक्षण !

बॅंकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या मल्ल्याला फक्त दोन हजारांचा दंड

गोगलगायीच्या त्रासाने धनंजय मुंडे वैतागले!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी