मुंबई

अक्षय्य तृतीया विशेष: सोनेखरेदी करणाऱ्या ग्राहकांपुढे मोठी अडचण

सोनेखरेदीचा सर्वात मोठा दिवस असलेला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला आहे. या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणे किंवा नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. मात्र केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केलेत्यामुळे ग्राहक दागिने खरेदीची तयार करीत असताना हॉलमार्क हा कळीचा मुद्दा झाला आहे. मुंबईतील सराफा व्यावसायिकांसाठी मात्र ही डोकेदुखी ठरली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत तीन लाखांहून अधिक छोटे-मोठे सराफा व्यावसायी आहेत. परंतु सोयी व पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे सोनेखरेदी करणाऱ्या ग्राहकांपुढेही मोठी अडचण उभी राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत हॉलमार्किंग करणाऱ्या केंद्रांचा आकडा फारच कमी आहे. सराफांनी हॉलमार्क केंद्राकडे दागिने पाठवले तरी ते वेळेत परत मिळत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, हॉलमार्किंगबाबत सर्वच व्यावसायिकांना पुरेशी माहिती आहे, असेही नाही. सराफा व्यावसायिकांनुसार, एक ज्वेलर महिन्याला सरासरी 5 हजार दागिने हॉलमार्क करायला देतो. एका दागिन्यावर हॉलमार्किंग शिक्क्याचे कोंदण करण्यासाठी किमान 1 तास लागतो. त्यानुसार 100 केंद्रांचा आकडा फारच कमी आहे. महामुंबईचा विचार केल्यास, ठाण्यातील हा केंद्रांचा आकडा 14, रायगड पाच व पालघरमध्ये फक्त चार आहे.

हॉलमार्किंग अनिवार्य केल्यानंतर जुन्या दागिन्यांचे काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी विशेष यंत्र सोनारांकडे असते. अनेकदा ग्राहक जुने दागिने मोडून नवीन करतो. असे करताना त्या सोनाराला हे दागिने स्वत:च्या डोळ्यासमोर वितळविण्यास सांगावे. त्यानंतर सर्व दागिन्यांची एकत्रित अशी पट्टी तयार होते. या पट्टीची शुद्धता व वजन विशेष यंत्राने तपासणीची सोय सराफांकडे असते. ते करून मग त्यानुसार जुन्या सोन्याची 100 टक्के वजावट मिळते.

हॉलमार्किंग म्हणजे काय?
सोन्याची गुणवत्ता, त्याची शुद्धता, नेमके वजन याचे प्रमाणीकरण हॉलमार्किंगद्वारे होते. त्यासाठी भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) केंद्र निश्चित केली आहेत. दागिन्यांवर हॉलमार्किंगचे कोंदण होते त्यावेळी संबंधित केंद्राची खूण, शुद्धतेचा क्रमांक व वजन नमूद केले जाते. हे बघूनच ग्राहकांनी खरेदी करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ कामं !

अक्षय्य तृतीयेच्या आधी ‘या’ अशुभ गोष्टी घरातून काढून टाका; समृद्धी वाढेल

गुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी..!

Akshaya Tritiya Special: Big problem for gold buying customers, Akshaya Tritiya 2023, Akshaya Tritiya, hindu mythology, gold-silver buying, gold buyers

Team Lay Bhari

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

9 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

9 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

10 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

11 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

12 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

13 hours ago