मुंबई

महाराष्ट्र भूषण: डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या गौरव सोहळ्यात रणरणत्या उन्हात लाखोंचा जनसागर लोटला

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज ‘महाराष्ट्र भूषण 2022’ सन्मानाने गौरविण्यात आले. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो नागरिक खारघरमध्ये दाखल झाले होते. विशेषतः आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी बोलताना निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपली भूमिका मांडताना श्वास चालू असेपर्यंच हे काम असंच चालू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहीरात करायची गरज काय आहे असे धर्माधिकारी म्हणाले. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. माझा श्वास असेपर्यंत हे कार्य सुरु राहणार आहे. असं देखील ते यावळी म्हणाले. यावेळी महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याची सुरूवात “जय जय महाराष्ट्र माझा…” या महाराष्ट्र गीताने झाली.

यावेळी त्यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. मात्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कारात मिळालेली मानधनाची 25 लाख रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची मोठी घोषणा केली.

नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्यांनी तयारी केली होती. या कार्यक्रमात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

दरम्यान आप्पासाहेब यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. शुक्रवार पासून काही सदस्य या ठिकाणी तंबू टाकून राहिलेले आहेत विशेष म्हणजे यात काही लहानग्यांचीही हजेरी आहे. दरम्यान आजचे कमाल तापमान 36 सेल्सिअस आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात आप्पासाहेबांच्या महाराष्ट्र भूषण गौरव सोहळ्याला हजेरी लावून जनतेचे त्यांच्याविषयीचे प्रेम आणि आदर दिसून येते.

हे सुद्धा वाचा: निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!

अमित शाह मुंबईत; अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देणार

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आता २५ लाख रुपये; २७ नवांचा सरकारकडे प्रस्ताव नव्या नावांवर देखील विचार

Dr. Appasaheb Dharmadhikari, Maharashtra Bhushan ceremony, Appasaheb Dharmadhikari, Maharashta Bhushan 2022, Appasaheb Dharmadhikari honord with Maharashtra Bhushan at navi mumbai

Team Lay Bhari

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

10 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

11 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

12 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

14 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

14 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

15 hours ago