मुंबई

बसमध्ये मोबाईल वापरला तर गुन्हा दाखल होणार; वाचा बेस्टचा नवा ‘नियम’

अनेकजण सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठमोठ्याने बोलतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात. यामुळे बेस्टने अशा प्रवाशांना सक्त ताकीद देत बेस्टमध्ये स्मार्टफोन वापरण्यास मनाई केली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये ‘इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ / व्हीडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठया आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे य़ा आदेशात म्हटले आहे.

बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा असून बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होवू नये. याकरीता मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम 38 / 112) सदर प्रवाशावर कारवाई होवू शकते. यामुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये ‘इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ/व्हीडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठया आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे य़ा आदेशात म्हटले आहे.

बेस्टच्या ताफ्यात जवळपास 3,400 बसेस आहेत. बेस्टमुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरात सार्वजनिक परिवहन सेवा प्रदान करते. बेस्टच्या बसेसमधून दररोज 30 लाख हून अधिक प्रवासी प्रवास करतात. दरम्यान उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल असतात व त्याचा वापर मुक्तपणे करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाईलवर बोलत असतात. तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकत बघत असतात. आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसगाडीमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो, असे यामध्ये म्हटले आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago