33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईBEST: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर एसी बस

BEST: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर एसी बस

मुंबईची शान असलेल्या बेस्टच्या डबल डेकर बसेसचा इतिहास आता डिजिटलप्रणालीत प्रवेश करत आहे. बेस्टच्या डबलडेकर बसेस अत्यंत जुन्या झाल्याने त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे. त्यामुळे बेस्टच्या डिजिटलीकरणात आता नव्या इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत. मुख्यतः देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बेस्टच्या ताफ्यात सामील झाली आहे. आरटीओचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर ही बस रस्त्यावर धावणार आहे. (BEST: Electric Double Decker AC bus)

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST)च्या भारतातील पहिल्या एसी डबल-डेकर इलेक्ट्रिक बसेसचा ताफा या आठवड्यात मुंबईच्या रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी सायंकाळी उशिरा या बसेसचा ताबा बेस्टला मिळाला आहे. बेस्टच्या ताफ्यात 45 डबलडेकर बसेस आहेत. मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन 900 वातानुकूलित डबलडेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. अशोक लेलँड कंपनीच्या या बसेस आहेत. या इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जातोय. मात्र सुरुवातीच्या काळात आठवड्यातून एक बस सुरू करून बसचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर काही चाचण्या केल्यानंतर प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

देशातील पहिली स्विच मोबिलिटीने निर्मित या डबल-डेकर ई-बसचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उद्घाटन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सप्टेंबर 2022 मध्ये ही बस बेस्टच्या ताफ्यात सामील होईल अशी बेस्टची अपेक्षा होती, मात्र ही अपेक्षा फोल ठरली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करण्यास विलंब झाल्यामुळे यामागचे वेळापत्रक कोलमडले होते. प्रत्येक बसची किंमत ₹2 कोटी असून एका बसमध्ये प्रत्येकी सुमारे 90 प्रवासी प्रवास करू शकतात. ही बेस्ट सेवा वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गांवर धावणार आहे. कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गावर सुरुवातीला ही बस धावेल. या एसी बसचं कमीत कमी भाडं ५ किलोमीटरपर्यंत ६ रुपये असणार आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असतील.

BEST: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर एसी बस
Mumbai, India – August 18, 2022: India’s first AC BEST Double Decker Electric Bus unveiled at NCPA (Photo by google)

हे सुद्धा वाचा : BEST झालं राव: नव्या मेट्रोमुळे बेस्टला आले ‘अच्छे दिन’

रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका लागू करा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

VIDEO : मुंबई लोकल ट्रेन मध्ये छ.शिवरायांचा गजर

विशेषतः शहरातील या आगामी 200 इलेक्ट्रिक बसेसच्या वापरामुळे पर्यावरणतील कार्बनडायऑक्साईडचे जवळजवळ 41% प्रमाण कमी होणार असून दरवर्षी 26 दशलक्ष लिटर डिझेलची बचत देखील होणार आहे. या एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचे बरेच निरीक्षण आणि चाचण्या झाल्या आहेत. मात्र तरीही मुंबईकरांच्या सेवेसाठी ही पहिली बस दाखल झाल्यानंतर सार्वजनिक वापरासाठी सुरू करण्यापूर्वी काही दिवस बसची तपासणी करणार आहेत, अशी माहिती बेस्टचे अभियंते यांनी दिली.

BEST: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर एसी बस

बसचे वैशिष्टय 

ही स्विच EiV22 मॉडेल असून यात 231-kWh एवढ्या क्षमतेची त्याची बॅटरी आहे. ही बस एका संमिश्र ॲल्युमिनियम धातुपासून तयार करण्यात आली असून ती अधिक स्थिर आहे. त्याचप्रमाणे यात 300-400 किलोग्रॅम वजनाच्या बॅटरीसाठी टायर जवळ एक विशेष जागा देण्यात आली आहे. या बसची रेंज 250 किमीपर्यंत आहे. आणि ही प्रती किमी 160-180 वेगाने धावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केवळ 45-मिनिटांच्या चार्जसह 100 किमीचा पल्ला गाठू शकते, तर ही पूर्ण चार्ज होण्यासाठी 80 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी