मुंबई

BJP: ‘हिंदू सण हा भाजपचा आत्मा’

भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांचा पक्ष हा हिंदू सण सुरू ठेवणारा, जोपसणारा आणि वाढवणारा पक्ष आहे असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्षाने त्याच्या स्थापनेपासून हिंदू सण आणि उत्सवांना विशेष स्थान दिले आहे कारण हिंदूच्या प्रथा आणि सण साजरे करणे हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा आहे. आम्ही उध्‍दव ठाकरे यांच्‍या शिवसेनेप्रमाणे हिंदू सण बंद करणारे नाही किंवा ते साजरे करताना ‍निर्बंध घालणार नाही अशी आशिष शेलार यांनी केली.

मुंबई भाजपातर्फे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्‍सव स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली असून यामध्‍ये १०२६ मंडळे सहभागी झाली आहेत. या मंडळाचे परिक्षण करण्‍यासाठी तज्ञांची ३० पथके तयार करण्‍यात आली आहेत. आज मुंबई भाजपा कार्यालयाजवळून या पथकांच्‍या गाडयांना आशिष शेलारांनी झेंडा दाखवून सन्‍मानाने रवाना केले.

या स्‍पर्धेबाबत माहिती देताना आशिष शेलार म्‍हणाले की, हिंदू सण हा भारतीय जनता पक्षाचा आत्‍मा असून आम्‍ही कोरोना काळातही सण अखंडित ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला. कोरोनाचे संकट टळल्‍यानंतर दहिहंडी उत्‍सव भाजपाने जोरदार साजरा केला. आता गणेशोत्‍सवातही आमच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठया उत्साहाने सहभागी झालो आहोत.  आमच्या पक्षाने  मुंबईत सार्वजनिक गणेशोत्‍सव स्‍पर्धा जाहीर करताच त्‍या अनेक मंडळांकडूज प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मुंबईतील १०२६ मंडळे त्यात सहभागी झाली आहेत. त्‍यांचे परिक्षण ३० पथके करणार असून प्रत्‍येक पथकात कॅमे-यासह ३ जण असून एकुण ९० जणांचा समावेश असलेली ही पथके या सगळयांचे परिक्षण करणार आहेत.

हे सुद्धा वाचा –

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, सत्ता नसली तरी कामे करणार

Ambadas Danve: एकनाथ शिंदे राजकारणात गुंग, शेतकरी करताहेत आत्महत्या; अंबादास दानवेंचा घणाघात!

VIDEO : ‘बाळासाहेबांची शिवसेना आमच्यासोबत, शिल्लक राहिली ती पेंग्विन सेना’

कोराना काळात दुदैवाने उध्‍दव ठाकरे यांच्‍या शिवसेनेने १०० वर्षांची लालबागच्‍या राजाची परंपरा खंडित केली होती. अशा प्रकारे हिंदू सणांना विरोध करणारे आम्‍ही नाही. आमचा पक्ष हा हिंदू सणांची परंपरा जोपासणारा पक्ष आहे, असा टोलाही त्‍यांनी यावेळी लगावला.

यावेळी विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, प्रतोद आमदार प्रसाद लाड यांच्‍यासह महामंत्री संजय उपाध्‍याय, कोकण विकास आघाडीचे अध्‍यक्ष सुहास आडिवरेकर, गणेशोत्सव समन्वय महासंघाचे सरचिटणीस सुरेश सरनौबत यांच्‍यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष शेलार यांनी गणेशोत्‍सवा निमित्‍ताने मुंबईच्‍या सहाही जिल्‍हयांचा दौरा सुरू केला असून रोज रात्री ९ ते १ वाजेपर्यंत ते मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाना भेट देत आहेत. गेल्या दोन दिवसात त्‍यांनी उत्‍तर मुंबई आणि उत्‍तर पश्चिम या जिल्‍हयात दौरा करुन 30 मंडळांना भेटी दिल्‍या. ढोल ताशांचा गजरात, फटाक्‍यांची आतिशबाजी करीत गणपती बाप्‍पाचा जयजयकार करीत हे दौरे सुरू आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण दिसून येते आहे. मंगळवारी दक्षिण मुंबई तर बुधवारी दक्षिण मध्‍य मुंबई, गुरूवारी उत्‍तर पूर्व जिल्‍हयांचा दौरा करणार आहेत.

आमचा यू ट्यूब चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा –

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

11 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

11 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

12 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

12 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

13 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

13 hours ago