28 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : 'बाळासाहेबांची शिवसेना आमच्यासोबत, शिल्लक राहिली ती पेंग्विन सेना'

VIDEO : ‘बाळासाहेबांची शिवसेना आमच्यासोबत, शिल्लक राहिली ती पेंग्विन सेना’

सामनाच्या बातमीमध्ये भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करण्यात आला आहे. यानंतर भाजपचे नेते शिवसेनेवर तुटून पडले आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सकाळीच शिवसेनेवर पलटवार केला. कमळामध्ये तुम्ही बाई शोधता. बाईमध्ये आई व कडक लक्ष्मी सुद्धा असते, अशा शब्दांत शेलार यांनी शिवसेनेला फटकारले आहे. शिवाय आदित्य ठाकरेंना लक्ष्य करीत पेंग्विन सेना असाही उल्लेख करण्यात आला आहे.
आशिष शेलार यांच्यानंतर भालचंद्र शिरसाट यांनी सुद्धा उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांचा गट सध्या भाजपसोबत आहे. त्या अनुषंगाने ‘खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. उरलेली पेग्विंन सेना’ असल्याचा उल्लेख शिरसाट यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हाता तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबई महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक कृतीवर शिवसेना लक्ष ठेवून आहे. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी जिथे शक्य आहे, तिथे टीका करण्याची संधी भाजपच्या नेत्यांकडून साधली जात आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!