मुंबई

Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे १९९९ मध्ये मुख्यमंत्री होणार होते, पण शिवसेनेने…

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे भारतीय जनता पक्षातील मोठे नेते होते. हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या भाजपासोबत अठरा पगड जातीच्या लोकांना जोडण्याचे काम त्यांनी केले होते. मुंडे यांच्यामुळे भाजपा महाराष्ट्राच्या तळागाळात रूजला आणि फुलला. राज्यात 1995 ते 1999 या काळात शिवसेना – भाजप युतीचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी सुरूवातीला मनोहर जोशी व नंतर नारायण राणे मुख्यमंत्री होते. या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. या सरकारने साडेचार वर्षे पूर्ण केली. त्यानंतर 1999 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकारने लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुका घेतल्यास फायदा होईल, असे शिवसेना – भाजपच्या नेत्यांना वाटले म्हणून मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या.

सन 1999 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपला कमी जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा तेव्हा नुकताच जन्म झाला होता. काँग्रेसपासून शरद पवार विभक्त झाले होते. त्यामुळे साहजिकच काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या.

शिवसेना व भाजप युतीने एकत्रित निवडणुका लढविल्या होत्या. तरी सुद्धा युतीला कमी जागा मिळाल्या. सत्तेमध्ये येण्यासाठी युतीला थोड्याशाच आमदारांची गरज होती. त्यावेळी दोन छोटे पक्ष व काही अपक्ष आमदारांनी युतीला पाठींबा द्यायची तयारी दर्शविली होती. परंतु गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री व्हावेत अशी या छोट्या पक्षांची व अपक्ष आमदारांची अट होती. परंतु शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडला नाही. अन्यथा 1999 मध्ये गोपीनाथ मुंडे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते.

मुख्यमंत्री होण्याची गोपीनाथ मुंडे यांची पहिली संधी हुकली. पण दुसरी संधी चालून आली होती. सन 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले होते. त्यानंतर सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या होत्या. या निवडणुकांमध्ये राज्यात भाजप – शिवसेनेचीच पुन्हा सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. पण त्या अगोदरच गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे ते मुख्यमंत्री होवू शकले नाहीत.

हे सुद्धा वाचा

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Eknath Shinde : ‘एमएमआर’मधील विविध विकास कामे वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

BEST Bus Workers Strike : बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारला संप

हे दोन्ही किस्से ‘लय भारी’च्या दिवाळी अंकात मांडण्यात आले आहेत. ‘सकाळ’ व ‘सरकारनामा’चे माजी संपादक जयंत महाजन यांनी हे किस्से लिहिले आहेत. मराठवाड्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासह विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, प्रमोद महाजन, शिवराज पाटील – चाकूरकर असे मातब्बर नेते होवून गेले. या नेत्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख महाजन यांनी ‘लय भारी’च्या दिवाळी अंकात लिहिला आहे. महाजन यांच्या या लेखात अनेक रोचक किस्से नमूद करण्यात आले आहेत.

‘लय भारी’च्या दिवाळी अंकात 25 मातब्बर लेखकांनी लेख लिहिले आहेत. यात 9 राजकीय नेते, 11 संपादक व ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश आहे. गेल्या 75 वर्षातील देशातील व राज्यातील राजकीय वाटचालीचा या अंकात आढावा घेण्यात आला आहे. हिंदुत्ववादी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, साम्यवादी अशा विविध विचारसरणींच्या राजकारणांचे लेख या अंकात आहेत.

या दिवाळी अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषि मंत्री अब्द्ल सत्तार, माजी मंत्री आशिष शेलार, भाजप आमदार अतुल भातखळकर, शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू हर्षल प्रधान, माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर या राजकीय नेत्यांनी लेख लिहिले आहेत.

निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख व चंद्रकांत दळवी यांनी अनुक्रमे शरद पवार व दिवंगत गणपतराव देशमुख यांच्याविषयी लेख लिहिले आहेत. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, राही भिडे, विजय चोरमारे, प्रफुल्ल फडके, नंदकुमार सुतार, प्रसाद काथे, भारत कदम, भागा वरखडे, टेकचंद सोनवणे यांचे लेख आहेत. सामाजिक कार्यकर्ते विश्वास काश्यप व संदेश पवार यांचेही या दिवाळी अंकात लेख आहेत.

हा अंक महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे वाचकांनी आपल्या शहरांतील पुस्तक विक्रेत्याकडे या दिवाळी अंकासाठी आग्रह धरावा. अंक उपलब्ध झाला नाही तर 7045513110 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

तुषार खरात

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

19 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago