31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईBEST Bus Workers Strike : बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारला संप

BEST Bus Workers Strike : बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारला संप

मुंबईतील बेस्ट कर्मचारी मात्र आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संपावर उतरले आहेत. मुंबईतील महत्वाच्या बस आगारातील कंत्राटी पद्धतीत कामावर असलेल्या बेस्ट कर्मचारी यांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

राज्यभरात जनतेमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. पण मुंबईतील बेस्ट कर्मचारी (BEST Workers) मात्र आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संपावर (Strike) उतरले आहेत. मुंबईतील महत्वाच्या बस (Bus) आगारातील कंत्राटी पद्धतीत कामावर असलेल्या बेस्ट कर्मचारी यांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कामावर रुजू झाल्याचे नियुक्ती पत्र, वेतन, दिवाळी बोनस या व इतर मुद्द्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. परंतु बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे मात्र दिवाळीत प्रवाशांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईमधील महत्वाच्या असलेल्या दिंडोशी, प्रतीक्षा नगर, वरळी, शिवाजी नगर या बस आगारात देखील कंत्राटी बस कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

ऐन दिवाळीमध्ये बेस्टमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सामान्य नागरिकांना बसमधून प्रवास करताना याचा मनःस्थाप सहन करावा लागतोय. गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच कामबंद आंदोलन करण्यास सुरुवात केली. मुंबईतील सांताक्रूझ बस डेपोमधील बेस्ट कर्मचारी यांनी या संपाला सुरूवात केली. त्यानंतर हळूहळू मुंबईतील इतर बेस्ट कर्मचारी देखील संपावर उतरले.

मुंबईतील बेस्ट बसची सेवा सध्या आर्थिक डबघाईला गेलेली असताना सुद्धा बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीवर बसेस ताफ्यात घेतल्या जात आहेत. तसेच कंत्राटदाराकडून बस चालक आणि वाहक यांची देखील कंत्राटी पद्धतीवर भरती केली जात आहे. त्यामुळे बेस्टकडून कंत्राटदार कंपन्यांना ठरलेल्या रकमेनुसार रक्कम देत असते.

हे सुद्धा वाचा

Amitabh Bachhan : ‘केबीसी’च्या सेटवर बीग बीं सोबत मोठा अपघात; शुटींग दरम्यान नस कापली गेली

Goverment Jobs : आरोग्य विभागात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Lohi Gram Panchayat : लोही ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

दरम्यान, या सर्व बाबींमध्ये बेस्टमध्ये भरती केलेल्या चालक आणि वाहक यांना गेल्या काही महिन्यापासून ठरलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याची माहिती बेस्टमधील कंत्राटी चालक आणि वाहक यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच अद्यापही या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देखील दिले गेलेले नाही. तर दिवाळीमध्ये देण्यात येणाऱ्या बोनस सुद्धा या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. त्याचमुळे प्रशासनाच्या या कारभाराविरोधात अखेरीस बेस्ट कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे देखील बेस्टमधील चालक आणि वाहक यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

बेस्टमध्ये सध्या वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांतर्गत चालक आणि वाहक यांची भारती करण्यात येत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासन भरती प्रक्रियेपासून सध्या तरी लांब आहे. भरती प्रक्रियेचा भार बेस्ट प्रशासनाने खाजगी कंपन्यांवर टाकला आहे असे म्हणणे देखील आता चुकीचे ठरणार नाही. पण यामुळे ज्या खाजगी कंपन्यांकडून बेस्टमध्ये वाहक आणि चालक यांची भरती करण्यात येत आहे, ते बेस्ट प्रशासनाकडून येणारा पूर्ण मोबदला वाहक आणि चालक यांना देत नसल्याची धक्कादायक माहिती यामुळे समोर आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी