मुंबई

पालिकेला अखेर मुहूर्त सापडला; तीन वर्षांनी हिमालय पादचारी पूल रेल्वे प्रवाशांसाठी खुला

तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chatrapati Shivaji Maharaj Terminus) येथील दुर्घटनाग्रस्त झालेला हिमालय पादचारी पूल अखेर प्रवाशांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. मार्च २०१९ मध्ये हा पूल कोसळून सात निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर विविध कारणास्तव या पुलाचे बांधकाम प्रलंबित राहिले होते. मात्र, तब्बल तीन वर्षांनी आता हा पूल प्रवाशांना रहदारीसाठी सुरु करण्यात येणार आहे. या पुलाच्या एका बाजूला आता सरकते जिनेही लावण्यात येणार आहेत. हा पूल कोसळून सात नागरिकांचा बळी गेल्यानंतरच मुंबई महापालिका प्रशासनाला (BMC) जाग आली. त्यानंतरच शहरातील इतर पुलांचे लेखापरीक्षण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. तसेच मोडकळीस आलेले पूल रहदारीसाठी बंद करण्यात आले होते. (Himalaya Foot over Bridge opened for railway passengers after three years)

हे सुद्धा वाचा

VIDEO : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वीच बेकेसीमधील कमान कोसळली

सत्यजित तांबे यांच्याबाबत काँग्रेसचा अखेर मोठा निर्णय; मविआचा पाठिंबा कुणाला?

पंतप्रधान येत आहेत… दुपारी १२ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना घरी पाठवा !

गर्डर जोडण्याचे काम जोरात सुरु असून महिन्याभरात या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. करोना महामारीमुळे या पुलाच्या कामास विलंब लागला. तसेच जमिनीखाली असलेल्या वाहिनीच्या जाळ्यांमुळेही या कामाची गती मंदावली होती. या पुलाचे खांब उभारण्यापूर्वी जमिनीखाली असलेल्या जलवाहिन्या, ‘बेस्ट’ तसेच ‘एमटीएनएल’च्या केबलबाबत योग्य त्या उपायोजना करणे आवश्यक होते. यासाठी जवळपास वर्षाचा अवधी लागला. तसेच या पुलाची रुंदी वाढविण्यासाठी जमिनीच्या उपलब्धतेचाही प्रश्न होता, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या विरुद्ध दिशेच्या एका बाजूला आता सरकते जिनेही लावण्यात येणार होते. मात्र, जागेअभावी हा महापालिकेने हा निर्णय रद्द केला होता. पण २०२२ मध्ये या पुलाच्या एका बाजूला आता सरकते जिने उभारण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे.

सात महिने सल्लामसलत करण्यातच घालवले…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उत्तरेकडे असलेल्या या पुलाची प्रवाशांना खरोखरच गरज आहे का? हा गहन प्रश्न सोडवण्यातच महापालिका प्रशासनाला तब्बल सात महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या निर्णयक्षमतेबाबत सर्वसामन्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. पण लेखापरीक्षणाचा अहवाल आल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना या पुलाच्या उपयुक्ततेबाबत खात्री पटली. २०२१ मध्ये या पुलाचा ५० हजारपेक्षा अधिक प्रवाशांनी वापर केला होता, असे या अहवालात म्हंटले आहे. मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या कामासाठी निविदाही काढली होती. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ५.७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. १५ महिन्यांमध्ये हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार होता.

टीम लय भारी

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

2 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

2 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

3 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

3 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

4 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

4 hours ago