मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिलांची गैरसोय; शिवसेनेकडून तक्रार पत्र दाखल

देशातील वर्दळीच्या प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच प्रवास करणाऱ्या महिला प्रवाश्यांना एअरलाइनमार्फत होणाऱ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने इंडिगो एअरलाइनकडे तक्रार पत्र दाखल करण्यात आले आहे. इंडिगो एअरलाइन प्रवासादरम्यान एका महिलेला सिक्युरिटी चेक इन केल्यानंतर मासिक पाळी आली. त्यामुळे त्या महिलेने एअरलाईनच्या कर्मचारीकडे सॅनिटरी पॅडची मागणी केली. परंतु एअरलाइन अशा प्रकारेचे कोणतेही साहित्य देत नाही, असे उत्तर तेथील ग्राउंड स्टाफ कडून मिळाले. त्यामुळे एनवेळेत सदर महिलेची गैरसोय झाल्याने याबाबत टीका होऊ लागली आहे. (Inconvenience of women at international airport.. Complaint letter filed by Shiv Sena)

सदर घटनेत एका महिलेला इंडिगो एअरलाइन (IndiGo airline) प्रवासादरम्यान मासिक पाळी आली होती. त्याचप्रमाणे त्यांनी सिक्युरिटी चेकिंग बोर्डिंग केल्यामुळे पुन्हा बाहेर जाऊन मेडिकल किंवा इतर ठिकाणाहून सॅनिटरी पॅड विकत घेणे शक्य नव्हते. अनेक विणवण्या केल्यानंतर सदर महिलेला एका स्टाफकडून वैयक्तिकरित्या सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आला. त्याचप्रमाणे एअरलाइन मार्फत अनेक महिला प्रवास करतात आणि हा विषय अतिशय गंभीर आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय लक्षात घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढावा जेणेकरून भविष्यात महिलेला अशा कोणत्याही प्रकरच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, अशा आशयाचे तक्रार पत्र सिवसेनेकडून दाखल करण्यात आले आहे.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने सर्व एअरपोर्टच्या टर्मिनल्समध्ये व विमानामध्ये अशा प्रकारे महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून त्वरित सॅनिटरी पॅडची मशीन किंवा साहित्य उपलब्ध करून द्यावे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे वाईट अनुभव कोणत्याही महिलेला येणार नाहीत, अशा मागणीचे तक्रारपत्र शिवसेना ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : शिवसेना नेते संजय राऊत हेच सध्या शिंदे सेनेचे एकमेव टार्गेट!

शिवसेना कुणाची : सुनावणी काही मिनिटेच चालली…

ठाणे महानगरपालिकेच्या नावाने महिलांनी फोडली मडकी

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने इंडिगो एअरलाइनच्या मुंबई प्रमुख सौ.आकृती बागवे व एअरपोर्ट मॅनेजर बेनी फर्नांडिस यांची त्वरित भेट घेऊन सदर झालेल्या प्रकाराबाबत लेखी निवेदन दिले. यात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन एअरपोर्टच्या पटांगणात असणे गरजेचे आहे. तसेच सॅनिटरी पॅडची उपलब्धता महिला ग्राहकांना करून देणे ही एअरलाईनची जबाबदारी आहे आणि तशी सुविधा विमानामध्ये देखील एअरलाइनने करावी, अशी मागणी कक्षाच्यावतीने सरचिटणीस विजय मालणकर व सचिव निखिल सावंत यांनी केली.

त्याचप्रमाणे या मागण्या योग्य असून सदर विषय गंभीर आहे व वरिष्ठांशी चर्चा करून सर्व विमानांमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन बैठकीदरम्यान सौ. बागवे यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्ट मंडळात कार्यकारणी सदस्य मनोज जाधव कक्ष लोकसभा चिटणीस संजय पावले सहचिटणीस कृष्णाकांत शिंदे, विक्रम शहा, मिलिंद तावडे, बाळा रेडकर व विजय पवार आदी उपस्थित होते.

Team Lay Bhari

Recent Posts

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

36 mins ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

2 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

3 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

3 hours ago

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

4 hours ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

6 hours ago