30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयशिवसेना नेते संजय राऊत हेच सध्या शिंदे सेनेचे एकमेव टार्गेट!

शिवसेना नेते संजय राऊत हेच सध्या शिंदे सेनेचे एकमेव टार्गेट!

शिंदे सेनेने सध्या शिवसेना नेते संजय राऊत हे एकमेव टार्गेट ठरविलेले दिसत आहे. शिंदे सेनेचे बोलणारे आमदार गेले काही दिवस सातत्याने राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसत आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काहीसे शांत असलेले राऊत नंतर नेहमीच्या आक्रमक मूडमध्ये आलेले दिसत आहेत. सध्या तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राऊत फारसे काही कटू, कठोर बोलणे टाळत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर मात्र त्यांचे रोखठोक वार सुरूच आहेत. त्यामुळे शिंदे सेनेनेही राऊत यांना निशाणा बनविलेले आहे. सोबतच सुषमा अंधारे याही शिंदे सेनेच्या रडारवर आहेत.

शिंदे सेनेने सध्या शिवसेना नेते संजय राऊत हे एकमेव टार्गेट ठरविलेले दिसत आहे. शिंदे सेनेचे बोलणारे आमदार गेले काही दिवस सातत्याने राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसत आहेत. (Sunjay Raut on HitList) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काहीसे शांत असलेले राऊत नंतर नेहमीच्या आक्रमक मूडमध्ये आलेले दिसत आहेत. सध्या तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राऊत फारसे काही कटू, कठोर बोलणे टाळत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर मात्र त्यांचे रोखठोक वार सुरूच आहेत. त्यामुळे शिंदे सेनेनेही राऊत यांना निशाणा बनविलेले आहे. सोबतच सुषमा अंधारे याही शिंदे सेनेच्या रडारवर आहेत.

महाविकास आघाडीच्या महामोर्चातील गर्दीवरून रामायण सुरूच आहे. या गर्दीला नॅनो म्हणून भाजप आणि शिंदे सेनेने हिणविले आहे. ”महामोर्चा”ला नॅनो म्हणणे चुकीचे असल्याचे राऊत सांगत आहेत. ‘शिंदे गटातील 40 आमदारांची बुध्दी नॅनो,’ असल्याची टीका त्यांनी केली. याशिवाय, दिल्लीश्वरांनी फडणवीसांना गुंगीचे इजेक्शन दिलेले दिसतेय, असेही राऊत म्हणाले. त्यावरून शिंदे सेनाही पेटली आहे. त्यांच्या जोडीला भाजपचे बडबोले नेतेही आहेतच. संजय राऊत यांचा मेंदू तपासण्याची गरज असल्याचे परवाच गिरीश महाजन यांनी म्हटले होते. त्यातच मराठा क्रांती मोर्चाचा फोटो ट्विट करण्यावरून शिंदे सेनेचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात राऊतांविरोधात वातावरण तापविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अहमदनगरमध्ये संजय राऊंतांच्या प्रतिमेला गांडूळ आणि सरड्याच्या प्रतिमेचा हार घालून निषेध करण्यात आला. नवी मुंबईतही राऊत यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक निदर्शने करत आहे. मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? असा सवाल संजय राऊत करीत आहेत. मात्र, क्रांती मोर्चाच्यावेळी “मूक मोर्चा” असा खोडसाळपणा मुद्दाम केल्याचे आता पद्धतशीरपणे पसरविले जात आहे.

बुलडाणा येथील शिंदे सेना आमदार संजय गायकवाड यांनी तर खळाच्या पातळीवर येऊन टीका केली आहे. ‘संजय राऊत हे पिसाळलेल्या कुत्र्याचे इंजेक्शन दिल्याने भुंकत राहतात,’ असे गायकवाड यांनी म्हटले आहे. शंभूराजे देसाई यांनी, ‘संजय राऊत 3 महिने सक्तीच्या रजेवर आहेत,’ असे पुन्हा म्हणून खिजविले आहे. त्यांनी तुरुंगात ज्योतिष संदर्भात काही पुस्तके वाचली असतील, म्हणून ते सरकार पडण्याच्या तारखा देऊ लागले आहेत, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही नाव न घेता राऊतांना चिमटे काढले. शिंदे म्हणाले, की त्यांना सध्या काही कामच उरलेले नाही. सकाळी उठले की ते सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात वाईट करतात. सत्ता गेल्यावर माणूस कसा फडफडतो, तडफडतो याचे हे चांगले उदाहरण आहे.

भरीस भर म्हणून संजय राऊत यांच्याकडे ज्या नाशिकचा कार्यभार आहे, तिथे त्यांनीच पक्षात आणलेली माणसे फुटली आहेत. खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यासह नाशिकमध्ये 100 शिवसेना पदाधिकारी फुटले आहेत. हा राऊतांना मोठा धक्का आहे. विशेष म्हणजे, आदल्या दिवसापर्यंत ही मंडळी राऊत यांच्यासोबत दौरे करीत होती, जेवणावळी झोडत होती. तरीही त्यांनी कोणताही सुगावा लागू दिला नाही. गोडसे हे मच्छर आहेत, असे राऊत यांनी नाशिकमधील फुटीनंतर म्हटले होते. त्यावर एरव्ही तोंडावरची माशीही न उडणाऱ्या गोडसे यांनी राऊत यांना चक्क “हिजडा” म्हटले. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है, अशा शैलीत खासदार हेमंत गोडसे यांनी संजय राऊतांवर पलटवार करत जशास तशा भाषेत उत्तर दिले.

हे सुद्धा वाचा :

संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर

शिंदे सेनेच्या आमदाराच्या नॅनो बुद्धीला झाला अल्झायमर; भूमिका बदलून पिसाळल्यागत बरळू लागले!

आपण मोदी-शहा यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे : नाना पटोले

संजय राऊत यांच्याबरोबरच सुषमा अंधारे यांनाही हिंदू देव-देवतांच्या विषयावरून घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेचा आवाज असलेल्या राऊत-अंधारे यांना दाबण्याचेच डावपेच शिंदे सेनेकडून आखले जात आहेत. अकोला येथील विश्व वारकरी संघटनेचे गणेश महाराज शेटे यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात मोहीम उभारली आहे. वारकरी संघटना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहूनही काहीही दखल घेतली गेली नाही, उत्तर मिळालेले नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. सुषमा अंधारे यांनी मात्र बिथरलेले लोक माझ्यावर काही ना काही कुबाड रचण्याचे प्रयत्न करत आहेत, असे म्हणत आहेत.

Sunjay Raut on HitList, ShindeSena and BJP, Sushma Andhare

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी