मुंबई

Maharashtra Monsoon Session : काळ्या-पांढऱ्या दाढीवरून पावसाळी अधिवेशनात रंगली जुगलबंदी

राज्यात नवनिर्वाचित भाजप-शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon session) आजचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (ता. १८ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ‘दाढी’ या विषयावरून जुगलबंदी रंगली. ज्यामुळे विधिमंडळाच्या सभागृहात एकच हशा पिकला. राज्यात अधिवेशन सुरु झाले की, जनतेचे संपूर्ण लक्ष त्याकडे लागलेले असते. कारण या अधिवेशनामध्ये एकमेकांवर टीका-टिपण्णी करणे, कोणाचेही नाव न घेता एकमेकांवर प्रहार करणे हे अधिवेशनात नेहमीच होतेच होते. अशीच जुगलबंदी आज सुद्धा विधिमंडळाच्या सभागृहात रंगली. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यात झालेल्या दाढीच्या जुगलबंदीमुळे ‘दाढी’ला सुद्धा फार महत्व आहे, हे मात्र नक्की.

छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असे म्हणत आनंद व्यक्त केला. तुम्ही मुख्यमंत्री झालात ते मला आंदण वेगळाच आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिलेच दाढीवाले मुख्यमंत्री झालेत, असे भुजबळ म्हणताच विधिमंडळाच्या सभागृहात हशा पिकला. पण काळ्या दाढीचा प्रभाव हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. तर पांढऱ्या दाढीचा प्रभाव हा संपूर्ण हिंदुस्थानावर आहे, असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Nitin Gadkari : भाजपकडून नितीन गडकरींना दुजाभाव?

Nashik Central Jail Attack : कैद्यांचा जीवघेणा हल्ला, पोलिसाचे फोडले डोके

Vinod Kambali : माजी स्टार क्रिकेटर विनोद कांबळी कामाच्या शोधात

दरम्यान, छगन भुजबळांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दाढीच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिले. भुजबळ साहेब हे लोकसभेतील भाषण होत, पण तुम्ही ते विधानसभेत केलं. पण ठीक आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणताच विरोधकांकडून यांची दाढी पांढरी आहे, म्हणून ठीक आहे का ? असं बोलण्यात आले. यानंतर या टोल्याला उत्तर देताना आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान केला जातो, असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यातील या जुगलबंदीमुळे सभागृहामध्ये काही काळासाठी का असेना पण हास्याचा कल्लोळ उठला होता. ज्याची मज्जा सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनीच घेतली.

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

9 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

10 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

10 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

10 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

10 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

14 hours ago