मुंबई

कसारा लोकल सेवा ठप्प; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल, लांब पल्ल्याच्या ट्रेन खोळंबल्या

सध्या कसारा लोकल सेवा ठप्प झाली आहे. आसनगाव ते कसारा दरम्यान डाऊन मार्गावर आटगावजवळ मालवाहतुकीच्या रेल्वेगाडीचे इंजिन बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दुपारी दीड वाजेपासून लोकल, लांब पल्ल्याच्या ट्रेन खोळंबल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या आसनगावच्या अलीकडे अडकल्या आहेत. कल्याणच्या पुढे कासारा लोकल बंद आहेत. काही गाड्या आसनगावपर्यंतच धावल्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ही स्थिती कायमच आहे. सध्या इंजिन मार्गावरून हटवून वाहतून सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आसनगाव स्थानकात 800 हून अधिक प्रवासी अडकून पडले आहेत. त्यात अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या माहितीनुसार, आसनगाव स्टेशन मास्तर यांच्याकडून नेमकी माहीती मिळत नाही. आता केंद्रीय नियंत्रण कक्षाकडून उद्घोषणा केली जात आहे. कसारा मार्गावरील आणि कल्याण व पुढील अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या गेल्या आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आसनगावच्या अलीकडे ट्रेन्स थांबविल्या जात आहेत.

फाईल फोटो

हे सुद्धा वाचा : 

मुख्यमंत्री म्हणाले, फलाटावर उभे राहिलो की आपण लोकलच्या आत आपोआप जातो

लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार

नव्या वर्षांत धावत्या लोकलमध्ये मिळणार निःशुल्क वायफाय

रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यावर भर देत आहे. लोकल ट्रेन सेवेला प्राधान्य देण्याऐवजी त्या रद्द केल्या जात असल्याचा आरोप उपनगरी प्रवासी संघटनांनी केला आहे. डोंबिवलीला 12:38ला पोहोचणारी डाऊन कसारा ट्रेन रद्द करण्यात आली आहे. कसाराकडे जाणारी डाउन लाईन ब्लॉक झाली आहे. आटगावजवळ मालवाहतूक ट्रेन इंजिनात बिघाड झाला आहे. ते सुरुवातीला कसारा येथे नेले जाणार होते. मात्र, आता ते खडवली स्थानकात नेले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आसनगावला 1:21 ला पोहोचणारी कसारा डाऊन ट्रेन रद्द करण्यात आली. त्यानंतर एकही कसारा डाऊन लोकल धावलेली नाही. जनशताब्दी एक्सप्रेस दोन तासांपासून आसनगाव स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.

Kasara Local Service Halted Central Railway Trains Running Late Goods Train Engine Fault Near Atgaon Station
विक्रांत पाटील

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

6 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

6 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

10 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

10 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

11 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

12 hours ago