मुंबई

मुंबई महानगरपालिका १००० किमी रस्ते धुतले जाणार

राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर म्हणजे मुंबई आहे. एवढंच नाहीतर मुंबईमध्ये केवळ देशातून नाहीतर जगभरातून लोकं रोजगारासाठी येत असतात. असंख्य लोकसंख्येने मुंबईमध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण निर्माण होत आहे. यामध्ये सर्वाधिक वायुप्रदूषणाचा मुंबईला अनेकदा फटका पडला आहे. मुंबई शहर सर्वाधिक दूषित म्हणून गणलं गेलं आहे. अशातच आता मुंबई महानगरपालिकेने वायूप्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील धूळ आटोक्यात आणण्यासाठी रस्ते धुतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हा आदेश दिला आहे.

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये पाण्याच्या १० टँकरचा वापर करावा जेणेकरून वायूप्रदूषण नियंत्रणात येईल. सध्या कंत्राटदारांचे आणि पालिकेचे मिळून एकूण १०० टँकर आहेत. रस्ते धुण्यासाठी ३५० टँकर वापरले जातील. दोन हजार किमीच्या रस्त्यांपैकी १ हजार किमी रस्त्यांपर्यंतचे अंतर धुतले जाणार आहेत. २४ अधिकाऱ्यांनी ६० फुटांहून अधिक किमीचे रस्ते आणि वर्दळीचे पदपथ धुवून टाकावे. पालिकेच्या अखत्यारीत २ हजार किमीपर्यंतचे रस्ते असून ७०० किमीचे रस्ते धुण्याचे काम सुरू आहे. टँकरच्या वाढीव संख्येमुळे रोज १००० किमीचे रस्ते धुतले जाणार आहेत.

हे ही वाचा

मुस्लिम मुलीची श्रीरामाच्या जयघोषात दर्शनासाठी पायी आयोध्यावारी

गौतम अदाणी आणि शरद पवार यांची भेट, चर्चेला उधाण

सुप्रिया सुळे पुढील दहा महिने बारामतीत तळ ठोकून बसणार

३१ डिसेंबर दिवशी महास्वच्छता अभियान ही मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील १० ठिकाणी होणार आहे. ही मोहीम गेट वे ऑफ इंडियापासून सुरू होणार आहे. या ठिकाणी १ हजार स्वच्छ्ता कर्मचारी असतील. पालिकेने राबवलेले स्वच्छ्ता अभियान राज्यपातळीवर राबवले जाणार आहे अशी माहिती इकबाल यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये धुळीचे अधिक साम्राज्य आहे. यामुळे मुंबईमध्ये वायूप्रदूषण होत आहे. शहरातील मुख्य ७ प्रकल्पांमुळे धूळ होत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago